मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची प्रचंड चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पहिल्याच दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत मराठी आणि हिंदी आवृत्त्यांमधून एकूण ११.३५ कोटींची कमाई केली आहे.
-शिवरायांचा पराक्रम पाहून प्रेक्षक भारावले मुंबई: १ मे २०२६ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जोरदार ओपनिंग ...
दिपाली सय्यद म्हणाल्या, “महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मी काल ‘राजा शिवाजी’चा प्रीमियर पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर मला वाटतं की हा एक अत्यंत अप्रतिम सिनेमा आहे. रितेश विलासराव देशमुख उर्फ भाऊ यांचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चित्रपटाबद्दल अनेकांनी ट्रोल केलं होतं, पण प्रत्यक्ष पाहिल्यावर तसं काहीही वाटलं नाही, प्रत्यक्षात सिनेमा अप्रतिम आहे.”
View this post on Instagram
त्या पुढे म्हणाल्या, “चित्रपटातील प्रत्येक भूमिका, शिवराय, जिजाऊ, सई माता, अफजलखान आणि स्वतः शिवाजी महाराजांचा रोल रितेश देशमुखांनी अत्यंत प्रभावीपणे साकारला आहे. महाराजांनी आपल्यासाठी जे केलं, त्या महान व्यक्तिमत्त्वावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यामुळे रितेशजींचं मनापासून कौतुक वाटतं. प्रत्येकानं घराच्या बाहेर निघून हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे. सगळ्यांना विनंती करेन एकाही व्यक्तीने हा चित्रपट बघणं सोडू नये. चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा.” अशी विनंतीही त्यांनी केली.
१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे 'नमन तुला'हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे. या गाण्यात ...




