मंत्री नितेश राणेंनी घेतली वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

  89

कुडाळ प्रतिनिधी : मंत्री नितेश राणेंनी कुडाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मंत्री नितेश राणेंनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. वीज वितरण कंपनीच्या नियंत्रण कक्षाच्या कामाची पद्धत समजून घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी काही सूचना दिल्या.

मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचा विजेचा पुरवठा अनेक तासांसाठी खंडीत झाला होता. या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. यानंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कुडाळमध्ये तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. कंपनीने नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर या कक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी कुडाळमध्ये कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कक्षाकडे किती तक्रारी आल्या आणि त्यातील किती सोडवल्या गेल्या तसेच कशा प्रकारे सोडवल्या गेल्या याची माहिती घेतली. यनंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.



कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे, आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच अनेक तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या असे मंत्री नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Add Comment

गणपतीला कोकणात जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकांवर गर्दी

आज रविवार असल्याने गणपतीला कोकणात जाण्यासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणाहून

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

खेड जवळील मुंबई-गोवा महामार्गावर लक्झरी बसला भीषण आग, प्रवासी थोडक्यात बचावले

खेड मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ रविवारी (दि. २४) पहाटे २.१० वाजता लक्झरी बसला भीषण आग लागल्याची घटना

पनवेल-चिपळूणदरम्यान 6 अनारक्षित विशेष रेल्वे गाड्या

कोकणात जाण्यासाठी गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये वाढणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भाविक

रत्नागिरीच्या रस्त्यांवर लवकरच धावणार ई-बसेस, एसटी महामंडळाची ई-क्रांतीकडे वाटचाल

एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून,

"मोदी एक्प्रेससने गावाक जाऊचो आनंद काय वेगळोच" कोकणकरांना घेऊन पहिली मोदी एक्सप्रेस सुटली

गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई आणि मुंबई परिसरातील कोकणकरांना कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरु करण्यात