आता घरबसल्या उपलब्ध होणार शासकीय सेवा

एमएमआरडीएचे ऑनलाईन आरटीएस पोर्टल 


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)आरटीएस अणि इंओडीची विविध वि डिजिटल परिवर्तन घडवत नागरिक सेवा गतिमान केल्या आहेत, एमएमआरडीएने ऑनलाईन 'सेवा हक्क पोर्टल (आरटीएस पोर्टल) सुरू केले आहे.


पारदर्शक आणि नागरिककेंद्री प्रशासनाच्या दिशेने में एक मोठे पाऊल आहे. या एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना महत्त्वाच्या १५ नागरी सेवांचा सुलभअॅक्सेस प्राप्त होईल. यामुळे आता एका क्लिकवर सर्व शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्यांतर्गत आणि डॉ. संजय मुखर्जी महानगर आयुक्त यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेले हे पोर्टल म्हणजे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सेवा वितरणात करण्यात आलेल्या एका परिवर्तनीय बदलाची नांदी आहे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते या आरटीएस पोर्टलचे उद्%E2%80%8Cद्घाटन करण्यात आले.


यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, भाप्रसे एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त वस्तिक कुमार पाण्डेय भाश्रनो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या अधिनियमाशी हा उपक्रम पूर्णतः सुसंगत असून, नागरिकांना जलद, पारदर्शक आणि जबाबदारीने सेवा देण्याच्या एमएमआरडीएच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरन कमी होणार असून सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत. आरटीएस पोर्टलमुळे नागरिकांना कधीही व कुठूनही विविध सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची, अर्जाची स्थिती थेट पाहण्याची आणि तत्काळ सूचना मिळण्याची सुविधा मिळते, या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयांतील गदीं लक्षणीय प्रमाणात कमी होईल.

Comments
Add Comment

मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, गुंदवलीवरून थेट गाठता येणार मिरा रोड

मुंबई : मुंबईतील मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या गुंदवलीवरून निघालेली मेट्रो दहिसर पूर्व

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात