राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना अमेरिकेतील यूएस इंडिया एसएमई काउन्सिल (U.S. India SME Council, Washington DC) यांच्यातर्फे आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर (Outstanding Visionary Leader & True Changemaker) हा प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १४ मार्च २०२६ रोजी जाहीर करण्यात आला असून त्यांचा सत्कार २५ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित विशेष समारंभात करण्यात येणार आहे.


राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी महाराष्ट्रात विशेषतः परभणी जिल्ह्यात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. महिला उद्योजकांना प्रोत्साहन, लखपती दीदी योजना, ग्रामीण महिलांसाठी सिल्क अँड मिल्क उपक्रम, तसेच एकल महिला सशक्तीकरण अभियान यांसारख्या योजनांद्वारे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती परिषदेत देण्यात आली आहे.


अमेरिका-भारत आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी कार्यरत असलेली यूएस इंडिया एसएमई काउन्सिल (U.S. India SME Council) ही संस्था लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, नाविन्यपूर्ण उद्योजकता वाढविणे तसेच पायाभूत सुविधा, ऊर्जा, शाश्वत विकास, आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी काम करते.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)