Bullet Train : बुलेट ट्रेनसाठी विरार स्थानकाच्या कामाला सुरूवात!

३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू


मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरु झाले असून तो ३५.३२ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आहे. या कामासाठी १५५५ घन मीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे.

महाराष्ट्र-गुजरातदरम्यान ५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे काम गुजरातसह महाराष्ट्रातही वेगाने सुरू आहे. बीकेसी स्थानकानंतर विरार हे दुसरे स्थानक आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांतून बुलेट ट्रेन धावणार असून हा प्रकल्प दोन राज्यांमधील महत्त्वाचा आर्थिक दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी त्याने आता वेग पकडला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील पहिल्या बीकेसी स्थानकाचे काम आधीच सुरू झाले आहे. महामुंबईतील ३ जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन धावणार असल्याने तो दोन राज्यांमधील महत्त्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरणार आहे.



बुलेट ट्रेनची उभारणी तीन पॅकेजमध्ये करण्यात येत असून तिसऱ्या पॅकेजमध्ये महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील १३५ किमी शिळफाटा आणि झारोळी गावादरम्यानच्या मार्गिका आणि ठाणे डेपोसह ठाणे, विरार, बोईसर स्थानक उभारणीचा समावेश आहे. यातील विरार स्थानकाची पायाभरणी सुरू झाली असून एकूण ९ स्लॅबनंतर बुलेट ट्रॅक टाकण्यासाठी काम सुरू होणार आहे.

महाराष्ट्र-गुजरातदरम्यान ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरातसोबत महामुंबईमध्ये देखील वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी त्याने आता वेग पकडला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील पहिल्या बीकेसी स्थानकाचे काम आधीच सुरू झाले आहे. महामुंबईतील ३ जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन धावणार असल्याने तो दोन राज्यांमधील महत्त्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरणार आहे.

 

असं असणार विरार स्थानक


विरार स्थानकाच्या तळमजल्यावर तिकीट आरक्षण केंद्र, सरकते जिने, लिफ्ट, प्रतीक्षागृह, प्रवासी सुविधा केंद्र, सुरक्षा तपासणी, प्रथमोपचार केंद्र, दुकाने असतील. पहिल्या मजल्यावर ४ ट्रॅक असतील. त्यांच्या दोन्ही दिशांना प्लॅटफॉर्म असणार आहे.
Comments
Add Comment

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी