PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान


तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी सकाळी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना झाले. हा त्यांचा दुसरा इस्रायल दौरा आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः अमेरिका आणि इराणमधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर, भारत-इस्रायल धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसदेला संबोधित केले.



‘स्पीकर ऑफ द नेसेट’ने सन्मानित :


दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी इस्रायली संसद नेसेटला संबोधित केले. यावेळी त्यांना इस्रायलच्या ‘स्पीकर ऑफ द नेसेट’ पदकाने सन्मानित करण्यात आले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.


बुधवारी (२५ फेब्रुवारी) इस्रायली संसद नेसेटमध्ये पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर नेसेटचे सभापती अमीर ओहाना यांनी त्यांना इस्रायलचा सर्वोच्च बहुमान प्रदान केला. पंतप्रधानांना ओहाना यांनी स्पीकर ऑफ द नेसेट हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदींनी याला भारत आणि इस्रायली मैत्रीचे प्रतीक संबोधले. नेसेटमधील भाषणानंतर पंतप्रधान मोदींचे टाळ्यांच्या कडकडाटात इस्रायली खासदारांनी स्वागत केले. तसेच त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी आणि फोटोही काढले.





पॅलेस्टाईनकडूनही मिळाला आहे सन्मान :


यापूर्वी २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींना पॅलेस्टाईनने ग्रॅंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन या पुरस्काराने गौरवले होते. इस्रायल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही शत्रू देशांकडून त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आहे.



इस्रायली पंतप्रधानांनी केले स्वागत :


पंतप्रधान मोदी तेल अवीवमध्ये दाखल झाल्यानंतर स्वत: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकाल बाजूला ठेवून त्यांचे स्वागत केले. यावेळी एअरपोर्टवर दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात आली. तसेच पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी हिंदीमध्ये ‘नमस्ते’ आणि हिब्रूमध्ये ‘शालोम’ लिहून एक ऐतिहासिक संदेश देण्यात आला. शालोमचा अर्थ शांतता असा होतो. जो आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारताच्या भूमिकेचे वर्णन करतो.

Comments
Add Comment

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

Ajit Doval : "जमीन, आकाश किंवा पाताळात... आम्ही त्यांचा माग काढू" , 'ऑपरेशन सिंदूर'बाबत पंतप्रधान मोदींचा संदेश ; अजित डोवाल यांच्याकडून आठवणींना उजाळा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट संदेश होता की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारे मग ते

Fast Track Court : महाराष्ट्रात ११७ फास्ट ट्रॅक कोर्ट, १.३५ लाखांहून अधिक प्रकरणे प्रलंबित

नवी दिल्ली : देशात सध्या कार्यरत असलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टांची (जलद गती न्यायालये) एकूण संख्या ८८४ असून, १७,५४,६७५