मुंबईतील खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण

बॅरिकेट्ससह रस्तेही वाहतुकीस खुले करणार


मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. येत्या २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक अर्थात बॅरेकेट्स हटविले जातील आणि रस्ते वाहतुकीस खुले केले जाणार आहेत. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे (फिनिशिंग वर्क) प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत.

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट (पीक्यूसी अर्थात (काँक्रिट ओतणे) रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. पैकी, ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर घेतली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या रस्ते काँक्रिट कामांचा गुरुवारी २९ मे २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला.



या हंगामात हाती घेण्यात आलेली रस्ते काँक्रिटीकरणाची नियोजित कामे पूर्णत्वास येत आहेत. काँक्रिट ओतण्याची कामे २० मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने ही मुदत २३ मे २०२५ पर्यंत वाढविण्यात आली होती. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली आहे. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे ( फिनिशिंग वर्क) प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जातील.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही कामे रात्रीच्यावेळी करावीत. रस्तारोधक हटवावेत, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. रस्ते कामाचा राडारोडा, बांधकाम साहित्य हे रस्त्यांचा कडेला पडून राहू नये. ते विनाविलंब उचलावे, असे निर्देश देताना बांगर म्हणाले की, मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील राडारोडा, उर्वरित बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी रस्तानिहाय नियोजन करावे, त्यासाठी समर्पित गट तयार करुन आवश्यकतेनुसार अधिकचे मनुष्यबळ नेमावे. येत्या दोन-तीन दिवसांत राडारोडा हटविण्याची कार्यवाही पूर्ण होईल, हे सुनिश्चित करावे, अशी सूचना अभिजीत बांगर यांनी केली. उप आयुक्त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, यांच्यासह उप प्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आणि दुय्यम अभियंता या बैठकीस उपस्थित होते.
Comments
Add Comment

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५

Will the ITR filing 2025 date be extended? : ITR फायलिंगसाठी तांत्रिक अडचणी! आता फक्त इतके दिवस शिल्लक, ITR डेडलाईन वाढणार का? अपडेट जाणून घ्या

मुंबई : आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम मुदत आता अगदी जवळ आली आहे. करदात्यांसाठी १५ सप्टेंबर २०२५ ही शेवटची तारीख

भायखळा के पी रोडवर भीषण अपघात पार्सल चा ट्रक उलटला

मुंबई: मुंबईतील भायखळ्याच्या के. पी. रोडवर पार्सलचा ट्रक उलटून अपघात, वाहन चालकाला झोप लागल्यानं अपघात झाल्याची