कापडे–कामथे रस्त्यावर झाड कोसळले; आपत्ती निवारण यंत्रणेकडून वाहतूक पूर्वपदावर

पोलादपूर : कापडे–कामथे रस्त्यावरील बोरज हद्दीत व गोपाळवाडी जवळ वादळी वाऱ्यामुळे झाड आणि माती रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र आपत्ती निवारण यंत्रणेकडून तातडीने जेसीबीच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला आणि वाहतूक सुरळीत झाली.


गेल्या आठवड्याभरात संततधार पावसाने उकाडा कमी झाला असला, तरी सायंकाळच्या मुसळधार पावसात झाडे उन्मळून पडल्याने कापडे–कामथे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी अडचणीत आली होती.



दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील साखर–खडकवाडी रस्त्यावर गुडघाभर चिखल साचले आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण कक्षासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक यंत्रणांनी ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीवर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

२९ पैकी २५ महापालिकांवर भाजप महायुतीचा भगवा

मतदारांचा विकासाला कौल; ठाकरे बंधुंसह पवार काका पुतण्याला दणका मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

Shrikant Pangarkar : गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर जालन्यातून विजयी, राजकीय पक्षांच्या दिग्गजांना चारली धूळ

जालना : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालांत जालन्यातून एक धक्कादायक आणि चर्चेचा निकाल समोर आला आहे. ज्येष्ठ

Pune Mahapalika Result : पुणे महापालिका निकाल : एकत्र येऊनही काका पुतण्याचं नुकसान, भाजप आघाडीवर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने स्पष्ट आघाडी घेत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून