निरा डावा कालवा फुटल्याने शेतात, घरात पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची उपपमुख्यमंत्त्री अजित पवार यांची माहिती


बारामती : मागील तीन-चार दिवसांत बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी (दि. २९) रोजीही त्यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.


उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी या गावासह अन्य गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यांना १० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.


बारामतीसह राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल! हे एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे. शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.


सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले

Comments
Add Comment

Pune Crime Firing : घायवळ गॅंगचा प्रकाश धुमाळांवर गोळीबार, २०० मीटरवर पोलिस स्टेशन तरी पोलिसांना यायला अर्धा तास का लागला?

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचे थैमान थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. नुकतेच टोळीयुद्धाचे प्रकार घडून

Nanded Accident : ब्रेक फेल अन् ट्रकने उडवली जीप! दुचाक्यांचा चेंदामेदा; नेमकं काय घडलं? थरकाप उडवणारा अपघात

नांदेड : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून त्यात भर पडली आहे नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड

ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी सायंकाळी हृदयविकाराच्या

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घ्यायला जात असाल तर आधी हे वाचा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन आज दिवसभर राहणार बंद मुंबई: कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर हे प्रसिद्ध