घरकुल योजनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

मुरबाड : मुरबाडजवळील देवराळवाडीवरील भरत भस्मा याचे कुडाचे घर अतिवृष्टीत कोसळले. घरातील अख्खं कुटुंब गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यातील घरकुल योजनेचा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे.


घरकुल योजनेचा लाभ धनदांडग्यांनी लाटल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरासाठी वणवण करावी लागत आहे. आदिवासी गरीब भस्मा कुटुंबाला वेळीच घरकुलाचा लाभ मिळाला असता तर हा अनर्थ टळला असता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.


भस्मा कुटुंबाचे कुडाचे घर अतिवृष्टीने कोसळल्यानंतर बोगस घरकुल योजनेच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील पोटगावपासून पाटगावपर्यंत, शेलगाव-शाईपासून सावर्ण- मेर्दी माळशेज घाट माथ्यापर्यंत असलेल्या तालुक्यातील सर्व बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर