मविआ गेली खड्ड्यात...राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार; ठाकरेंच्या नेत्याची थेट धमकी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले आहेत. मविआ गेली खड्ड्यात, (आमच्यासाठी) आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्यही दराडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




काय म्हणाले दराडे ?


राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांन माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला. सावकरांबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणार नाही, सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही राहुल गांधी यांना धडा शिकवू...जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.


बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख आहेत. काँग्रेस नेते, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल सातत्याने जी वक्तव्य करत आहेत, ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्यासाठी हिंदुत्व आणि सावरकर आधी येतात, असा पुनरुच्चार दराडे यांनी केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आता चांगलेच आक्रमक झालेले दिसत असून याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात ७ दिवसीय माघी गणेशोत्स..

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आज आपल्याला प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. आज माघी

फार्मा कंपनी डॉ रेड्डीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर शेअर इंट्राडे ६% उसळला

मोहित सोमण: डॉ रेड्डीज लॅब्स लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर

सजली अवघी धरती, पाहण्यास तुमची कीर्ती...माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

माघी गणपती जयंती हा हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्म झाला आहे.

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही

शेअर बाजाराची जोरदार वापसी सेन्सेक्स ८५० व निफ्टी २६१ अंकांनी उसळला

मोहित सोमण: गेले काही दिवसांत सातत्याने बाजारात घसरण झाली होती. आज मात्र पुन्हा वापसी करत शेअर बाजारात तुफान वाढ

टोल थकबाकीमुळे वाहन सेवा थांबणार

एनओसी, फिटनेस प्रमाणपत्र व नॅशनल परमिटवर बंदी मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी