मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

शेतीसह अलिबाग शहरही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकुण सरासरी सरासरी १६०.४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


अलिबाग शहर समुद्रकिनारी असल्याने आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती असल्याने अलिबाग शहरातील रस्ते, भाजी बाजारपेठ, पीएनपी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चेंढरे बायपास, अलिबाग ते पिंपळभाट दरम्यानचा रस्ता, शहरातील नाले, चेंढरे हद्दीतील नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत होते.



दुसरीकडे अलिबाग शहरासह जवळील चेंढरे हद्दीतील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याबरोबरच नाल्यांतील कचरा रस्त्यांवर वाहून आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा विविध प्रकारच्या वाहन चालकांना त्रास सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.



जिल्ह्यात पंचनामा करण्याचे काम सुरू


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत. दुसरीकडे गेल्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरे, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्रीसह गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एकूण १३ कच्च्या घरांचे, २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन आरोग्य केंद्र, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी एक पोल्ट्री व
इतर पाच सार्वजनिक मालमत्तांचे समावेश आहे.



तालुक्यांमध्ये पावसाची नोंद 


अलिबागला २४१, मुरुडला २५१, पेणला १६०, पनवेलला २४५.२, उरणला १००, कर्जतला १०३, खालापुरला १२३, माथेरानला १५२, सुधागडला १०२, माणगावला १३६, तळा १७४, महाडला ७८, पोलादपूरला ११८, श्रीवर्धनला १७०, म्हसळ्याला २८२, रोह्याला १३२ असा एकूण २५६७.२ मिलीमीटर (सरासरी १६०.४५) पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

२०१० पासून टियर १ शहरांमध्ये परवडणाऱ्या घरांच्या किमतीत मोठी सुधारणा: कॉलियर्स

मुंबई: दिलेल्या नव्या अहवालातील माहितीनुसार, प्रमुख शहरांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासामुळे, परवडणाऱ्या

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

'हायटेक केसपेपर नोंदणी' ठरतेय डोकेदुखी !

अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या लांब रांगा अलिबाग  : येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये आयुष्मान

हनुमान रोड मेट्रो स्टेशनला डॉ. रमेश प्रभू यांचे नाव देणार

मुंबई : शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विलेपार्ल्याचे माजी आमदार व

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल

निकाल लागून ४५ दिवसांनंतरही भरती प्रक्रिया मंदावलेलीच!

वैद्यकीय आरोग्य अधिकारी भरती प्रक्रियेत गोंधळ निकालानंतर ‘अतिरिक्त गुण’ नियम बदलाचा निर्णय वैद्यकीय आरोग्य