आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा 'अलर्ट मोड'वर

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश


अलिबाग  :रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सध्याची पावसाची आकडेवारी पाहता, संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष राहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल, साकव आणि पाणीसाठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.



यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली होती. आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावेत असे निर्देश तटकरे यांनी दिले.

या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .