Building Collaps in Thane: ठाण्यात जुन्या इमारतीचा भाग कोसळला; १७ कुटुंबांचे स्थलांतर

ठाणे:  ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील नंदादीप इमारतीचा भाग कोसळल्याची घटना (Building Collapses in Thane) घडली. पंचपरमेश्वर मंदिराजवळील नंदादीप या ५० वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


तीन मजली असलेल्या नंदादीप इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग रात्री अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.



इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये


महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसादरम्यान, ठाणे शहरात मंगळवारी पहाटे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, ज्याला नागरी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच धोकादायक म्हणून वर्गीकृत केले होते. ही घटना वागळे इस्टेट परिसरातील असून, भरपावसात नंदादीप इमारतीत पहाटे २.२५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर इमारतीतील १७ कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


 तसेच शेजारील दोन इमारतींतील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर प्रभाग समिती आणि बांधकाम विभाग यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असून, अशा जुनाट आणि धोकादायक इमारतींच्या स्थितीकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे या प्रकारावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Comments
Add Comment

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

भिवंडी-निजामपूर पालिका आणि एमसीईडी यांच्यात सामंजस्य करार

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर पालिका आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्यात शहरातील महिलांसाठी

भाईंदरमध्ये मराठी माणसाला घर देण्यास नकार !

बिल्डर लॉबीची अजब वागणूक भाईंदर : मराठी विरुद्ध अमराठी वादाचे भाईंदरमध्ये पडसाद उमटले आहेत. भाईंदरमध्ये एका

कल्याण - डोंबिवलीतील विकासकामांसाठी निधी उपलब्ध

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील कामांना गती देण्यासाठी राज्य नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोटी

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर