अवकाळीने शेतकऱ्यांवर मोठे संकट

पिकांच्या पंचनाम्याची क्रांतीसेनेची मागणी


राहुरी : तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बियाण्यासाठी सोडलेल्या घास पिकाचे बियाणे काढणीपुर्वीच मोड फुटल्याने पूर्णतः निकामी झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई- निवेदन पाठवून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील ५ ते ६ दिवसांपासून संततधार अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घास पिक बियाण्यासाठी सोडले होते. यासाठी अळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक औषधांची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. मात्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने बियाण्याला काढणीपूर्वीच मोड फुटून ती बियाणे पूर्णतः निकामी झाली आहेत.

परिणामी, या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर पंचायत समिती व महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

गावातील तलाठी यांना याबाबत कळवले असता, त्यांच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी आपले सरकार हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तालुक्यातील कोंढवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीसह अवेळी पडणाऱ्या पावसाच्या आपत्तीमुळे बाधित झालेल्या चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक