अहमदाबाद ते मुंबई दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार

  65

५०८ किमीच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती


मुंबई :गुजरातमधील अहमदाबाद ते महाराष्ट्रातील मुंबई या दरम्यान भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. ५०८ किलोमीटरच्या या अंतरासाठी हाय स्पीड रेल्वे कॉरिडोरची निर्मिती करण्यात येत आहे. याविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. एका वृत्तानुसार, २०२८ पर्यंत गुजरातमधील साबरमती ते वापी यादरम्यान काम पूर्ण होईल. तर २०३० पर्यंत या मार्गावरून बुलेट ट्रेन धावेल. त्यामुळे बुलेट ट्रेनचे स्वप्न अजून पाच वर्षे दूर असल्याचे समोर येत आहे.


नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) रायडरशिप सर्वे केला आहे. त्यामध्ये प्रवाशी संख्या, भाडे किती असावे, ट्रॅफिक किती असेल याचा अंदाज घेण्यात आला आहे. सध्या कार, टॅक्सी, बस, एसी ट्रेन, विमान प्रवास असे पर्याय प्रवाशांकडे आहेत. त्यापेक्षा बुलेट ट्रेन त्यांच्यासाठी कशी फायदेशीर ठरेल यावर मंथन सुरू आहे. हे सर्वेक्षण राष्ट्रीय मार्ग आणि एक्सप्रेसवेच्या जवळपास सुरू करण्यात येईल. अहमदाबाद ते मुंबई ५०८ किलोमीटरचा टप्पा बुलेट ट्रेनसाठी असेल. गुजरातमध्ये ३४८ किमीचे अंतर तर महाराष्ट्रात १५६ किमीची लांबी असेल. महाराष्ट्रात मुंबईत बीकेसी, ठाणे, विरार, भोईसर या स्टेशनची निर्मिती सुरू आहे. तर गुजरातमध्ये वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती स्टेशन यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आतापर्यंत ३०० किमीचा वायाडक्टची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील BKC स्टेशनचे काम प्रगतीपथावर आहे. ३८३इपिअर वर्क, ४०१ फाऊंडेश आणि ३२६ किमी गर्डरचे काम पण पूर्ण करण्यात आले आहे.



बुलेट ट्रेनचे गुजरातमधील काम तेजीने होत आहे. तर महाराष्ट्रात भूसंपादनाचा विषयी गंभीर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भागांविषयी, जंगल अधिग्रहणाविषयी तीव्र मतभेद समोर आले होते. त्यामुळे पर्यावरणाला मोठा धक्का लागण्याची भीती व्यक्त होत होती. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर भारताचा त्या १५ देशांच्या यादीत समावेश होईल, जिथे बुलेट ट्रेन धावते.

Comments
Add Comment

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्टच्या बस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टळणार मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले देखावे

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

Mumbai Goa Highwayवरील कशेडी बोगद्याजवळ मोठी दुर्घटना, कोकणात जाणाऱ्या खासगी बसला आग

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी