मान्सून केरळमध्ये दाखल, एक-दोन दिवसांत कोकणात पोहोचणार

आठवडाभर अगोदरच हजेरी, सोळा वर्षांनंतर रेकॉर्ड मोडला


मुंबई  : दरवर्षी बळीराजा ज्या मान्सूनची आतूरतेने वाट बघत असतो, तो मान्सून यंदा वेळेच्याही अगोदर दाखल झाला आहे. तब्बल आठ दिवस अगोदर मान्सूनने केरळमध्ये धडक दिली आहे. २००९ मध्ये मान्सूनने २३ मे रोजी केरळमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर थेट यंदा २०२५ मध्ये मान्सून २४ मे रोजी दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



एक-दोन दिवसांत कोकणात होणार दाखल


आता पुढील एक ते दोन दिवसांत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. तर मुंबईत १ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.



मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याच्या तारखा


२००९- २३ मे, २०१०- ३१ मे, २०११- २९ मे, २०१२- ५ जून, २०१३ - १ जून, २०१४- ६ जून, २०१५- ५ जून, २०१६- ८ जून, २०१७- ३० मे, २०१८- २९ मे, २०१९- ८ जून, २०२०- १ जून, २०२१- ३ जून, २०२२- २९ जून, २०२३- ८ जून, २०२४- ३० मे.



मान्सूनसाठी पोषक वातावरण


मान्सून शनिवार, दि. २४ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. शनिवारी मान्सूनने दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राचा काही भाग, संपूर्ण लक्षद्वीप भाग, केरळ, माहे, कर्नाटकचा काही भाग, मालदीवचा उर्वरित भाग व कोमोरिन भाग, तामिळनाडूचा अनेक भाग तसेच नैऋत्य, पूर्व-मध्य बंगाल उपसागराचा उर्वरित भाग, पश्चिम-मध्य आणि उत्तर बंगाल उपसागराचा काही भाग आणि मिझोरामचा काही भाग व्यापला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Comments
Add Comment

माहीम मध्ये पुन्हा सुरू झालाय ‘सी फूड प्लाझा'

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांना दर्जेदार, ताज्या आणि चविष्ट अशा माशांच्या मेजवानीचा आस्वाद उपलब्ध करून

ऐन दिवाळीत वाढीव बोनस साठी बेस्ट आणि अदानीच्या कर्मचाऱ्यांचा इशारा

मुंबई: दिवाळी अगदी तोंडावर आलेली असतानाच मुंबईकरांसाठी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. बेस्ट उपक्रम आणि अदानी

मेट्रो स्टेशनवर आता मोफत वाय-फाय!

मुंबई : भूमिगत मेट्रो लाईन-३ मध्ये मोबाइल नेटवर्क (फोनचे नेटवर्क) चांगले मिळत नसल्याच्या अनेक प्रवाशांच्या

ऐतिहासिक! ‘झवेरी बाजार’चा मुख्य रस्ता आता फक्त चालण्यासाठी खुला!

मुंबई : मुंबईतील खूप प्रसिद्ध असलेल्या झवेरी बाजारातून थेट मुंबादेवी मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता, बाजाराच्या

Diwali Shopping : दादर मार्केटमध्ये 'महागर्दी'; चेंगराचेंगरीची भीती!

मुंबई: मुंबईतील सर्वात लोकप्रिय खरेदीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या दादर मार्केटने, दिवाळीपूर्वी खरेदीदारांचा

एसटी बँकेच्या बैठकीत तुफान हाणामारी!

एसटी सहकारी बँकेच्या बोर्ड बैठकीत सदावर्ते विरुद्ध शिंदे गट हाणामारी; बाटल्या फेकल्या, खुर्च्या