Mumbai Local Train : मुंबईकरांनो ही बातमी तुमच्यासाठी, उद्या रेल्वेचा ब्लॉक, कोणती रेल्वे वाहतूक मंदावणार? जाणून घ्या

मुंबई : पावसाळा आता दणक्यात सुरु झाला असून मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेचे काम सुरळीत ठेवण्यासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे. दररोज लाखो नागरीक मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरून प्रवासी करत असतात. रोजच्या रोज त्यांचा भार वाहणाऱ्या रेल्वेची, लोकलची आणि त्या जिथून धावतात त्या मार्गांचीही देखभाल करण्यासाठी अधूनमधून ब्लॉक घेण्यात येत असतात. तसाच ब्लॉक उद्या मुंबईत घेण्यात येणार आहे.




कोणत्या मार्गावर ब्लॉक ?


पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्री ब्लॉक घेत रविवारी लोकल सेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मध्य रेल्वेच्या मार्गवर मात्र, उद्या अर्थात रविवार (२५ मे रोजी) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.




  • माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येईल.

  • या ब्लॉकच्या वेळी, CSMT येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.

  • शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील, याची नोंद घेऊनच नागरिकांनी आपल्या प्रवासाची योजना आखावी असे आवहन करण्यात आलं आहे.

  • तर ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

  •  मुलुंड व माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील आणि नंतर माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.




‘पश्चिम रेल्वे’वर शनिवारी मध्यकालीन ब्लॉक



  • पश्चिम रेल्वेवर मात्र आज, अर्थाक शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येईल. भाईंदर-बोरिवली स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रात्री ३ पर्यंत ३.३० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

  • भाईंदर-बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री १.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यंत ३.३० तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.



ट्रान्स हार्बरवर ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक



  • ट्रान्स हर्बर मार्गावर ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४. १० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

  • ठाणे येथून सकाळी १०. ३५ ते दुपारी ४. ०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/ पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन लाईन सेवा आणि पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०. २५ ते दुपारी ४. ०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.


Comments
Add Comment

मुलुंड पश्चिम येथील पक्षीगृह बांधण्याच्या निविदेला प्रतिसाद मिळेना...

मुंबई (खास प्रतिनिधी) : नाहूर, मुलुंड पश्चिम येथे मुंबई महापालिकेच्या वतीने पक्षीगृह उभारण्यात येणार असून या

दिवाळीनिमित्त मुंबई विमानतळावर रोषणाईची अनोखी सजावट

मुंबई: दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आकर्षक पद्धतीने उजळून

राज्यातील ४७ महसूल अधिकाऱ्यांना बढती

मुंबई : दिवाळीच्या पर्वावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४७ महसूल

जगातील टॉप १० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावे तुम्हाला माहिती आहेत का? या यादीत भारत पिछाडीवर

मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये अनेक उद्योगपतींनी नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत त्यांच्या

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध विनोदी कलाकार आणि ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांचे आज निधन झाले.

बोरिवलीत ट्रॅफिक पोलिसावर रिक्षाचालक का संतापला? गुन्हा दाखल

मुंबई : बोरिवली परिसरात वाहतूक नियंत्रणाचं कर्तव्य बजावत असलेल्या ट्रॅफिक पोलिस कर्मचाऱ्यावर एका व्यक्तीने