बियाणे खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथके

कृषी विभागाची खते, बियाण्यांवर करडी नजर


पालघर : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कृषि निविष्ठा (बियाणे, खते, कीटकनाशके) उपलब्ध व्हावीत, तसेच बियाणे खतांचा काळाबाजार होऊ नये यासाठी कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय एक आणि तालुकास्तरीय आठ अशी एकूण नऊ भरारी पथके पालघर जिल्ह्यात गठित करण्यात आली आहेत.



शेतकऱ्यांना बी- बियाणे विक्री करताना बनावट कंपन्यांची बियाणे विकणे, खताची साठवणूक करून काळाबाजार करणे, बियाणे कीटकनाशकांच्या विक्रीत फसवणूक करणे अशा अनेक तक्रारी दरवर्षी शेतकऱ्यांकडून केल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये सोबतच त्यांना दर्जेदार बियाणे, खत, कीटकनाशके उपलब्ध व्हावीत यासाठी भरारी पथक नेमण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार पालघर जिल्ह्यात भरारी पथक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय भरारी पथकाचे प्रमुख म्हणून कृषि विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी हे असणार आहेत. या पथकात विश्वास बर्वे, ए.जे. राऊळ , काकासाहेब भालेकर आणि लक्ष्मण लामकाने यांचा समावेश आहे.


तसेच प्रत्येक तालुक्यात तालुका कृषि अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी (पथक प्रमुख), तर कृषि अधिकारी (तालुका कार्यालय), निरीक्षक वजने व मापे, मंडळ कृषि अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक (पंचायत समिती) यांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.