मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार – भारत निवडणूक आयोग

प्रचाराच्या नियमांमध्ये सुधारणा


मुंबई: मतदारांच्या सोयीसाठी आणि मतदान दिवशीच्या व्यवस्थापनात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, भारत निवडणूक आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे तसेच, प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्याने निश्चित करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. हे निर्णय लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५१ आणि निवडणूक आचारसंहिता, १९६१ यांच्याशी सुसंगत आहेत.


ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये मोबाईल फोनचा वाढता वापर लक्षात घेता, तसेच वृद्ध, महिला आणि दिव्यांग मतदारांना येणाऱ्या अडचणींचा विचार करता, आयोगाने मतदान केंद्राच्या बाहेरच मोबाईल ठेवण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आत केवळ बंद अवस्थेतील मोबाईल्स नेण्यास परवानगी राहील. प्रवेशद्वाराजवळ मोबाईल ठेवण्याची ही सुविधा दिली जाणार असून, मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी दिली जाणार नाही. मात्र, काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी याला अपवाद देऊ शकतात. मतदान गुप्ततेचा नियम (नियम ४९ एम) यापुढेही काटेकोरपणे पाळला जाणार आहे.


प्रचाराच्या संदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आत प्रचारास मनाई करण्यात आली आहे. मतदान दिवशी उमेदवारांनी मतदारांसाठी अनौपचारिक ओळखपत्र (VIS नसल्यास) देण्यासाठी ठेवलेले मदत बूथ हे आता मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या पलीकडे ठेवावे लागणार आहेत.


भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू व डॉ.विवेक जोशी यांच्या नेतृत्वाखाली, भारत निवडणूक आयोग मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत पार पाडण्याबरोबरच मतदारांसाठी सुविधा सुधारण्यासाठी सातत्याने नवकल्पना राबवत असल्याचे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

Comments
Add Comment

नितीश कुमार होणार मुख्यमंत्री! मतमोजणीची आकडेवारी येताच नेत्यांचा जल्लोष

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांच्या मतांची मोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या आकडेवारीनुसार एनडीएला आघाडी मिळत

अलीनगरमध्ये मैथिली ठाकूरची दमदार आघाडी

बिहार : बिहारच्या अलीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आणि लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांनी

दिल्ली स्फोट : दिल्ली स्फोटातील मुख्य आरोपी उमरच्या घरावर बुलडोझर! जम्मू-काश्मीर पोलिसांची धडक कारवाई

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली येथे सोमवारी (सायंकाळी ७ वाजता) झालेल्या भीषण स्फोटामुळे देशात खळबळ उडाली

घटनादुरुस्तीमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर पाकिस्तानात सर्वाधिक शक्तिशाली

तिन्ही सशस्त्र दलांचे संरक्षण दलप्रमुख म्हणून नियुक्ती नवी दिल्ली  : पाकिस्तानच्या संसदेने २७ व्या

Bihar Vidhan Sabha Election Result : बिहार विधानसभा मतमोजणीला लवकरच सुरुवात; नवे सरकार आज स्थापन होण्याच्या दिशेने पहिले पाऊल...

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान नुकतेच पार पडले असून, आज, निकालाचा 'महादिवस' आहे. आज या निवडणुकीचे

महिलांच्या वाढलेल्या विक्रमी मतदानामुळे एनडीएचे पारडे जड?

निवडणुकीची आज मतमोजणी व निकाल मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही