BMC Election 2025: शिंदे गटाचा जोरदार प्लॅन; मुंबईत १०० जागांवर लढणार, उपमहापौरपदावर डोळा!

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्ण जोमात तयारीला लागली आहे. शिंदे गटाने मुंबईतील २२७ पैकी १०० जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून, या जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.



पक्षाच्या रणनीतीची झलक


मुंबईत अलीकडेच झालेल्या बैठकांमध्ये माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे उपस्थित होते. यावेळी उपमहापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता असून, महत्त्वाच्या समित्यांवर नियंत्रण ठेवण्याचे लक्ष्य असल्याचे सुचवले गेले.



भाजपसोबत युती? की स्वतंत्र रणनीती?


महापौरपदावर भाजपाचा दावा असला, तरी शिंदे सेना उपमहापौरपद व इतर समित्यांची सूत्रे आपल्या हाती घेण्यास इच्छुक आहे. यासाठी निवडणूकपूर्व नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले आहे.



जिंकायचं तर मैदानात उतरावंच लागेल!


बैठकीत माजी नगरसेवकांनी इच्छूक उमेदवारांना स्पष्ट संदेश दिला की, प्रभाग सीमांकन समजून घ्या, जनतेत सक्रिय व्हा आणि जनसंपर्क वाढवा, कारण हेच विजयाचं शस्त्र ठरेल.


ठाण्यात पकड मजबूत असली तरी, मुंबईत शिंदे गटाला भाजपा, ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना BMC निवडणुकीत जोरदार एंट्रीसाठी सज्ज झाली आहे. १०० जागांवर लक्ष केंद्रित करत उपमहापौरपदासाठी 'शक्तीप्रदर्शन' निश्चितच पाहण्यासारखं असेल.

Comments
Add Comment

Dabewala E-Bikes : डबेवाल्यांना लवकरच १०५ ई बाईक्स; महापौर रितू तावडे यांनी केली घोषणा!

मुंबईतील एक प्रवेशद्वार डबेवाला संकल्पनेवर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत प्रस्तावित प्रवेशद्वारांपैकी एक

Deccan Queen Railway Festival : प्रतिष्ठित 'डेक्कन क्वीन' रेल्वे महोत्सव होणार साजरा

मध्य रेल्वेचा मुंबई विभाग २७ मार्च २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, गौरवशाली 'डेक्कन क्वीन

धक्कादायक! मुलुंडमध्ये १६ वर्षीय मुलीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपी अटकेत

मुंबई : मुलुंड परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने मुंबईत खळबळ उडाली आहे. केवळ बोलणं बंद केल्याच्या रागातून एका

खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर, शीतल म्हात्रेंचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक

किनारी रस्ता प्रकल्पात पादचारी भुयारी मार्गात छत उभारण्याचा प्रस्ताव फेटाळला

मुंबई: महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील भाग–२ मधील पादचारी भुयारी

नवी मुंबईचा प्रवास वेगवान होणार, ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास आता सिग्नलमुक्त

नवी मुंबई: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेने एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी