अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केले आहे. मनी लाँडरिंग विरोधी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. याची किंमत ₹३,७१६ कोटी आहे, अशी माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील पाली हिल परिसरात हे भव्य ६६ मीटर उंच आणि १७ मजली आहे. त्यांच्या समूह कंपनी, रिलायन्स कम्युनिकेशन्सशी (आरकॉम) संबंधित बँक फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात बहुमजली घर जप्त करण्यासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे. अंबानी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी येथील तपास संस्थेसमोर हजर राहण्याची अपेक्षा आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी ईडीसमोर पहिल्यांदा साक्ष दिली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. नवीन आदेशामुळे या प्रकरणात जप्त केलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य अंदाजे १५,७०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

अनिल अंबानींसाठी हा एक मोठा धक्का आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते व्यवसायात अडचणीत आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी त्यांच्या आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या बँक खात्यांना "फसवे" म्हणून वर्गीकृत करण्याच्या कार्यवाहीला स्थगिती देणारा एकल न्यायाधीशांचा अंतरिम आदेश रद्द केला. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखर यांच्या खंडपीठाने डिसेंबर २०२५ मध्ये दिलेल्या एकल खंडपीठाच्या अंतरिम आदेशाविरुद्ध तीन सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि अकाउंटिंग कन्सल्टन्सी फर्म बीडीओ इंडिया एलएलपी यांनी दाखल केलेल्या अपीलांना परवानगी देताना हा निर्णय दिला.

Comments
Add Comment

Birthday Celebration Firing : 'बड्डे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा'; रस्त्यात सेलिब्रेशन अन् बेबी एअरगनमधून गोळीबार महागात पडली

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये बेबी एअरगनमधून गोळीबार;10 जणांविरुद्ध गुन्हा, मुख्य आरोपी ताब्यात बोरिवली :

Publications Banned : अतिरेकी विचारांचे उदात्तीकरण करणाऱ्या ११४ प्रकाशनांवर बंदी

- राज्य सरकारचा निर्णय; 'काश्मीर किफाह – रेझिलियन्स अँड करेज', 'नवाई गझवा-ए-हिंद'चा समावेश मुंबई : हिंसक अतिरेकी

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून

Reay Road Railway Bridge : पूल विभागाचे अधिकारी गैरहजर, रे रोड रेल्वेवरील पुलाच्या वाढीव कामाचा प्रस्ताव केला दप्तरी दाखल

स्थायी समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक पुलांची तसेच उड्डाणपुलांची कामे

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :