Naxalites Surrender: छत्तीसगडमध्ये 33 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, सरकार करणार पुनर्वसन

  67

बिजापूर: छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. येथे ३३ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, त्यापैकी २४ जणांवर तब्बल ९० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणाचे कारण माओवादी विचारसरणीबद्दलचा भ्रमनिरास, आदिवासींवरील अत्याचार आणि सरकारच्या पुनर्वसन योजनांचा प्रभाव सांगितला जात आहे. गेल्यावर्षी २०२४ मध्ये, एकट्या बस्तरमधून तब्बल ७९२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी आता हिंसाचार सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला आहे.


या माओवाद्यांमध्ये पीएलजीए कंपनी क्रमांक 2 चे उपकमांडर, माड डिव्हिजन कंपनी क्रमांक ७ पीपीसीएम, एसीएम/पीपीसीएम, एलओएस कमांडर, सीएनएम अध्यक्ष, केएमएस अध्यक्ष आणि केकेबीएन डिव्हिजन पक्ष सदस्य असे अनेक उच्चपदस्थ नेते समाविष्ट आहेत. हे सर्वजण बऱ्याच काळापासून विजापूर, सुकमा आणि आसपासच्या भागात सक्रिय होते आणि अनेक नक्षलवादी घटनांमध्ये सहभागी होते.



आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणांचा फायदा


राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणामुळे प्रभावित होऊन या नक्षलवाद्यांनी हे पाऊल उचलल्याचे विजापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले. रस्ते बांधकाम, वीज-पाणी सुविधा, शिक्षण आणि आरोग्य सेवा यासारख्या विकासकामांमुळे नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्याची प्रेरणा मिळाल्याचे यादव यांनी सांगितले. आत्मसमर्पण कार्यक्रमाला केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (CRPF) उपमहानिरीक्षक राकेश कुमार, विजापूरचे एसपी डॉ. जितेंद्र कुमार यादव, कोब्रा आणि सीआरपीएफ बटालियनचे कमांडंट, एएसपी ऑपरेशन, जिल्हा राखीव गार्ड (DRG), बस्तर फायटर आणि एसटीएफ अधिकारी उपस्थित होते. या ऑपरेशनमध्ये डीआरजी, बस्तर फायटर, एसटीएफ, सीआरपीएफ आणि कोब्रा दलांनी विशेष योगदान दिले आहे.



माओवाद्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम


सरकारच्या आत्मसमर्पण धोरणाअंतर्गत, सर्व 24 माओवाद्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची प्रोत्साहन रक्कम देण्यात आली आहे. याशिवाय, त्यांना पुनर्वसन, रोजगार आणि शिक्षणाच्या सुविधा देखील दिल्या जातील जेणेकरून ते सामान्य जीवन सुरू करू शकतील.


यावर्षी 1 जानेवारीपासून विजापूर जिल्ह्यात एकूण 227 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, 237 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि 119 माओवादी मारले गेले आहेत. या आकडेवारीवरून असे दिसून येते की सरकारचे धोरण आणि सुरक्षा दलांची रणनीती नक्षलवादाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे. एसपी डॉ. जितेंद्र कुमार यादव यांनी इतर माओवाद्यांनाही आत्मसमर्पण करून सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा फायदा घेण्याचे आणि हिंसाचार सोडून समाजात शांततेत राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )