पावसाच्या हजेरीने नालेसफाईतील गाळ गेला वाहून

सफाईच्या कामाचे तीन तेरा वाजल्याने उद्दिष्ट गाठण्याबाबत प्रश्नचिन्ह


मुंबई :मुंबईतील छोट्या व मोठ्या नाल्यातील गाळाची सफाई तसेच मिठी नदीच्या सफाईच्या कामाला मागील एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षात सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत ही सफाई केवळ ६५.४५ टक्के एवढीच झाली आहे.


यंदा पावसाने लवकरच हजेरी लावल्यामुळे नालेसफाईच्या कामाचे तीन तेरा वाजले गेले आहे. नाल्यातील गाळ काढण्यात आल्यानंतर तो गाळ नाल्याच्या शेजारी सुकवण्यासाठी ठेवला जातो. काढलेला गाळ आणि नाल्यातील न काढलेला गाळही या पहिल्याच मुसळधार पावसात वाहून गेल्याने प्रशासनाला गाळ सफाईचे उद्दिष्ट साध्य करता येणार नाही.



छोट्या व मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या सर्व नाल्यांमधील गाळाची सफाई ही ६५.४५ टक्के झालेली आहे.


पावसाळ्यापूर्वी ८० टक्के, पावसाळ्या दरम्यान १० टक्के व पावसाळ्यानंतर १० टक्के अशाप्रकारे नाल्यातील गाळ काढणे अपेक्षित असते. या सर्व नाल्यांमधून पावसाळ्यापूर्वी ९,६१,६८० मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित होते.




  • मुंबईतील एकूण नालेसफाई : ६५.४५ टक्के

  • काढण्यात येणारा अपेक्षित गाळ : ९,६१,६८० मेट्रीक टन

  • काढण्यात आलेला आतापर्यंतचा गाळ : ६,२९,३९३

  • पश्चिम उपनगरातील नालेसफाई : ८७.७२ टक्के

  • मिठी नदीतील सफाई : ४९.९२ टक्के

  • छोट्या नाल्यातील सफाई : ५५.२८ टक्के

  • शहरातील नालेसफाई : ७०.२२ टक्के

  • पूर्व उपनगरातील नालेसफाई : ८६.२१ टक्के

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील