कोकण विभागात बांधकाम उपविभाग अव्वल

  33

मोखाडा: महाराष्ट्र शासन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन १०० दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत मोखाडा सार्वजनिक बांधकाम उप विभाग मोखाडा कार्यालयाच्या कोकण विभागातून प्रथम क्रमांकावर आले आहे. या मोहिमेत शासकीय कार्यालयांचे कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवादी साधने, नागरिकांना वेळेवर सेवा देणे, आदी घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आले. उपअभियंता विशाल अहिरराव यांनी कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्यात कामात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे.


राज्यभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने १०० दिवसांचा कृती आराखडा हा उपक्रम राबवण्यात आला. कोकण विभागातील बांधकाम विभागाच्या श्रेणीत मोखाडा उपविभाग प्रथम आल्याने या कार्यालयाचे प्रमुख अहिरराव यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. बांधकाम विभाग म्हटले की, भ्रष्टाचार आणि तत्सम बाबीचीच जास्त चर्चा नेहमी होत असते मात्र पहिल्यांदाच हे कार्यालय प्रशंसा करण्याच्या कसोटीवर खरे उतरले असून प्रशासन, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा, स्वच्छता, अनावश्यक कार्यालयीन कागदपत्रांची विल्हेवाट,कार्यालयीन सोयी सुविधा,नावीन्यपूर्ण उपक्रम, आधुनिक तक्रार निवारण प्रणाली या सारख्या अनेक विभागांत सुधारणा केल्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे.



काम गुणवत्तापूर्वक करण्याचे प्रयत्न


या यशाचे श्रेय माझ्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना जाते तसेच आमचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी वेळोवेळी आमचे मनोबल वाढवले असे अहिरराव यांनी बोलताना सांगितले आहे.अधिकारी लोकप्रतिनिधी, यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री यांना अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या १०० दिवसांत विशेष प्रयत्न करण्यात आले. या पुढेही असेच काम अविरत सुरू राहील.

Comments
Add Comment

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने

घोडबंदर ते तलासरी महामार्ग धोकादायक स्थितीत

तातडीने लक्ष द्यावे अशी खासदारांची मागणी वाडा : पालघर लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८

प्रियकरासोबत रंगेहाथ सापडल्याने पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला अटक

घरातच गाडले, भावानेच घरातील फरशा बदलल्या नालासोपारा : नालासोपारा येथे प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले गेल्यानंतर