GT vs LSG, IPL 2025: लखनऊचा गुजरातवर जबरदस्त विजय

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ६४व्या सामन्यात आज लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सवर जबरदस्त विजय मिळवला आहे. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरातसमोर विजयासाठी २३६ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र गुजरातला केवळ २० षटकांत  इतक्याच धावा करता आल्या. गुजरातकडून शाहरूख खान, जोस बटलर, रुदरफोर्ड, शुभमन गिल यांनी चांगली खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले.


दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला होता मिचेल मार्शच्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत २३५ धावा केल्या होत्या. मिचेल मार्शने या सामन्यात धमाकेदार खेळी केली.


लखनऊची सुरूवात धमाकेदार राहिली. मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५९ बॉलमध्ये ९१ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीदरम्यान मार्करमने केवळ ३३ बॉलमध्ये आपले अर्धशतक ठोकले. साई किशोरने मार्करमला बाद करत ही भागीदारी संपवली. मिचेल मार्शने या सामन्यात तुफानी खेळी केली. त्याने ५६ बॉलमध्ये शतक ठोकले आहे. मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांचीही चांगली जोडी जमली होती. मिचेल मार्शने ६४ बॉलमध्ये ११७ धावा तडकावल्या. या खेळीदरम्यान त्याने १० चौकार आणि ८ षटकार ठोकले.


सध्याच्या हंगामात गुजरात टायटन्सने आतापर्यंत १२ पैकी ९ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सनेही तितकेच सामने खेळले आहेत. मात्र त्यांना केवळ ५ सामने जिंकता आले आहेत. लखनऊचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला आहे.


Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.