गोखले पुलावर शुक्रवारपासून बससेवा

प्रारंभी तीन बसमार्ग धावणार


मुंबई : २०२२ मध्ये बंद करण्यात आलेला गोखले पूल अडीच वर्षांनी पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, पूल सुरु होऊन अजूनही बेस्ट बस सेवा यावरून सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना या पुलावरून बस सेवा केव्हा पूर्ववत होणार याची प्रतीक्षा होती. बेस्ट प्रशासनाकडून गोखले पुलावरील बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असून, सर्वेक्षणानंतर लवकरच ही बससेवा सुरु करू, असे सांगितले जात होते.अखेर शक्रवार २३ मे पासून बेस्टने, ए ३५९ ए ४२२ व ४२४ हे बसमार्ग पुन्हा गोखले पुलावरून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.




गोखले पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतल्यानंतर यावरील बस सेवा इतर मार्गानी वळवण्यात आली होती, तर काही बसमार्ग खंडित करण्यात आले होते. तर दुसरा काहीच पर्याय नसल्याने तीन बसमार्ग पूर्णतः बंद करावे लागले होते . हा महत्वाचा पूल बंद केल्याने पूर्व - पश्चिम प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत होते शिवाय वाहतूककोंडीत भर पडली. त्यामुळे आता गोखले पूर्ण क्षमतेने झाल्यानंतर बससेवा तात्काळ सुरु करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती.
फेब्रुवारी मध्ये गोखले पुलाची एक मार्गिका खुली झाल्यानंतर सातत्याने स्थानिकांकडून बसमार्ग पूर्ववत करण्याची मागणी सुरु होती . उद्या शनिवार २३ मे पासून बेस्टने ए ४२२- वांद्रे आगार ते विक्रोळी आगार-, ए ३५९ - हिरानंदानी (पवई ) बस स्थानक ते मालवणी आगार व ४२४ - गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)- असे तीन बस मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हि बससेवा सुरु झाल्याने पूर्व पश्चिम जाणाऱ्या व लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.



मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता.

Comments
Add Comment

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची ग्वाही नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित पिकांच्या नुकसानीपोटी ७३ कोटी ९१

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार

मुंबई : महाराष्ट्रातील बारव आणि विहीरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य

कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता

आता बँकेसारख्या सुविधा लवकरच! मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही

हार्बरवर साडेचौदा तासांचा ट्रॅफिक ब्लॉक

मुंबई : कुर्ला ते टिळकनगरदरम्यान वळण मार्गिकांच्या कामासाठी शनिवारी रात्री ११.०५ ते उद्या, रविवार दुपारी १.३५