तापमान वाढीमुळे केळी नामशेष होणार?

मुंबई : हवामान बदलामुळे वाढलेल्या तापमानासह विविध नैसर्गिक आपत्तींचा जगभरातील शेतीला मोठा फटका बसतो आहे. अतिवृष्टी, अति उष्णता, अति थंडीसह गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका केळी पिकाला बसतो आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे जगभरातील ६० टक्के केळी लागवडीला फटका बसला आहे. यंदा जळगाव परिसरातील केळीवरही तापमान वाढीचा परिणाम दिसून आला आहे.


‘ख्रिश्चन एड’ या संशोधन संस्थेने ‘गोइंग बनानाज: हाउ क्लाइमेट चेंज थ्रेट्स द वर्ल्ड्स फेवरेट फ्रूट’ या संशोधन अहवालात हवामान बदलामुळे वाढलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि तापमान वाढीचा केळी पिकावरील परिणामांचा आढावा घेतला आहे. त्यात म्हटले आहे. केळी हे गहू, तांदूळ आणि मक्यानंतर सर्वाधिक आयात होणारे फळ आहे.



जागतिक व्यापाराच्या आणि पोषण मूल्याच्या दृष्टीनेही केळी महत्त्वपूर्ण आहे. पण, हवामान बदलामुळे प्रामुख्याने तापमान वाढीसह अति थंडी, गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे लॉटिन अमेरिका, कॅरेबियन देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसत असून, २०८० पर्यंत एकूण केळी लागवडीपैकी ८० टक्के आणि जगातील अन्य केळी उत्पादक देशांमधील ६० टक्के क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. सध्या एकूण जागतिक केळी लागवडीच्या ६० टक्के क्षेत्राला तापमान वाढीच्या परिणामांचा सामना करावा लागत आहे.


तापमान वाढीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव वाढतो. केळीचे खोड, झाड कमकुवत होते. अशा काळात वादळी वारे, सोसायट्याचा वारे वाहिल्यास केळीची झाडे मोडून पडतात. तापमान वाढीमुळे ब्लॅक लीफ फंगस, या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, ही बुरशी केळीसाठी धोकादायक ठरत आहे. ब्लॅक लीफ फंगसमुळे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत तब्बल ८० टक्के कमी होते. ओलसर जागेत वेगाने प्रादुर्भाव होतो. त्यामुळे सध्या जगभरात तापमान वाढीमुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहेत.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे