Jyoti Malhotra : हजारो चाहत्यांची राणी, ज्योती मल्होत्राची कहाणी!

  38

हेरगिरी केली, ज्योती मल्होत्रा रडारवर आली

जिच्या व्हिडीओजवर लोकांनी भरभरून प्रेम केलं, जिच्या युट्यूबवरून लोकांना देशविदेशातील खानपान, राहणीमान आणि पर्यटन स्थळांची माहिती झाली, तीच युट्यूबर आता गद्दार निघालीय. होय, तुम्ही बरोबर ओळखलात. या गद्दार युट्यूबरचं नाव आहे ज्योती मल्होत्रा. याच ज्योती मल्होत्राने पर्यटन स्थळांची माहिती अशी काही दाखवली की शत्रूराष्ट्राला त्याचा फायदा झाला. तर चला पाहूया या गद्दार ज्योती मल्होत्राची कर्मकुंडली.

ज्योती मल्होत्रा. नाव तर ऐकलंच आहात. हीच आहे ती गद्दार जिनं चालाखीने शत्रूराष्ट्राला भारताची माहिती पुरवली. ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलवरील पर्यटन स्थळांचे व्हिडीओज पाहून शत्रूराष्ट्रांनी घातपात घडवलाय. हीच धक्कादायक माहिती समोर आली आणि फेमस युट्यूबर ज्योती मल्होत्रा गजाआड झाली. ज्योती मल्होत्राची कहाणी ही केवळ राजकीय नाही, तर एका हिंदी सिनेमाला शोभेल असा मसाला आहे. तिचे छान छान व्हिडीओज लोकांनी पाहिले. तिच्या व्हिडीओजमुळे लोकांना परदेश दिसलाय. तिच्यामुळे देशाविदेशातील खानपान, राहणीमान कळालं आणि आता अचानक तिच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आणि लोकांना धक्का बसला. ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचं उघड झालंय. त्यामुळे एनआयए, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर विभागाने तिच्याभोवती चौकशीचा फेरा आवळलाय. इतकंच नव्हे तर तिचे क्लाऊड स्टोअरेजही चौकशी यंत्रणांच्या रडारवर आहे. झालंय असं की, ज्योती मल्होत्रा जम्मू - काश्मीरमधील अनेक पर्यटन स्थळांचे चित्रण करायची. आता पर्यटन स्थळांचं चित्रण होतंय, म्हणून जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नव्हतं. याचाच फायदा ज्योती मल्होत्रा घेत होती. ती पर्यटन स्थळांची अशी काही माहिती द्यायची की त्यातून दहशतवादी आणि शत्रूराष्ट्राला इत्यंभूत माहिती मिळायची. सूत्रांच्या माहितीनुसार ती या व्हिडीओजमध्ये कुठे सुरक्षा यंत्रणा आहे, कुठून कसा प्रवास करायचा, कोणता मार्ग निवडायचा, कोणत्या गोष्टी कुठे आहेत आहे याची माहिती खुबीने द्यायची. ही गोष्ट एका व्यक्तीने लक्षात आणून दिली. त्यांनतर ती सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली. ज्योती मल्होत्राचा संशयास्पद प्रवास, परदेशी संपर्क आणि यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले संवेदनशील व्हिडिओ पाहिले गेले. डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत तिच्या विदेश दौऱ्यांसोबतच पठाणकोट, नाथूला पास आणि अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये संशयास्पद हालचालींचे पुरावे सापडले आहेत.
ज्योती मल्होत्राच्या अनेक व्हिडीओंतून धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळे तिचा स्मार्ट फोन, लॅपटॉप, फोटो मेटाडेटा आणि क्लाऊड स्टोरेज, सीमावर्ती भागांमधील व्हिडिओ रेकॉर्डिंगकडे तपास यंत्रणांचं लक्ष वेधलं. तिच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्समध्ये एक आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या संपर्कांशी संभाषण केल्याची माहितीही समोर आलीय. इतकंच नव्हे तर तिच्या क्लाऊड स्टोअरेजमध्ये असलेल्या व्हिडिओमध्ये सीमा सुरक्षा दलाची हालचाल, रडारचे ठिकाण आणि अतिसुरक्षित क्षेत्र यांची छायाचित्रं आणि व्हिडिओही आढळले आहेत. भारतातून हद्दपार करण्यात आलेला पाकिस्तानी उच्चायुक्तालयाचा कर्मचारी दानिश याच्याशी संबंधित बनावट प्रोफाइल्ससोबत चॅट आणि ग्रुप मेंबरशिप आढळली. त्याचबरोबर भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं त्यावेळी ती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती. ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर असलेल्या ज्योतीने पहलगामची रेकी केल्याचंही समोर आलंय. तिचं हे कृत्य राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणार आहे, असं हरियाणा पोलिसांनी म्हटलंय. भारताशी गद्दारी करणाऱ्या ज्योती मल्होत्राने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिलीय. पाकिस्तान भेटीदरम्यान तिने इंडियन गर्ल इन पाकिस्तान, इंडियन गर्ल एक्सप्लोरिंग लाहोर, इंडियन गर्ल ॲट काटस राज टेम्पल आणि इंडियन गर्ल राईड्स लक्झरी बस इन पाकिस्तान अशा नावाने काही व्हिडीओ तयार केले. याच व्हिडीओंच्या माध्यमातून दहशतवादी आणि पाकिस्तान यांना अप्रत्यक्षरीत्या माहिती मिळत होती.

आता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला कशी पुरवायची माहिती तेही पाहूया.

  • पाकिस्ताना गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क
  • व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅट ॲप्सचा वापर
  • गुप्तचर अधिकाऱ्यांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करणं
भारताशी गद्दारी करणारी ज्योती मल्होत्रा नेमकी कशी पकडली गेली, हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. शेवटी गद्दारच कामाला आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दानिश आणि ज्योती यांच्यात स्नेहसंबंध निर्माण झाले होते. हाच दानिश एकीकडे ज्योती तर दुसरीकडे गजालाच्या संपर्कात होता. त्याच दरम्यान आणखी एक एजंट राणा शाहबाज याला ज्योतीविषयी आकर्षण निर्माण झालं. मात्र दानिश सोबत देशोदेशी फिरत असलेली ज्योती राणा शाहबाजकडे लक्ष देत नव्हती. त्यामुळे संतापून ज्योतीचे कारनामे त्याने तपास यंत्रणांना दिले. आज ज्योती आणि गजाला पोलिसांच्या ताब्यात आहेत तर दानिश बेपत्ता आहे. एकूणच ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर ज्योती मल्होत्राच्या करारनाम्याचा आता अन्य ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर युट्यूबर्सना फटका बसणार आहे. पर्यटन क्षेत्र दाखवून आपली रोजीरोट कमावणारेही काही युट्यूबर्स आहेत. आता सुरक्षा यंत्रणांची यांच्यावर करडी नजर तर राहणार आहे. पर्यटन स्थळांची माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनल्सवरही बंदी येण्याची शक्यता आहे. गद्दार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवून मोठी चूक केलीय आणि या चुकीला आता माफी नाही.
Comments
Add Comment

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची