हेरगिरी केली, ज्योती मल्होत्रा रडारवर आली
जिच्या व्हिडीओजवर लोकांनी भरभरून प्रेम केलं, जिच्या युट्यूबवरून लोकांना देशविदेशातील खानपान, राहणीमान आणि पर्यटन स्थळांची माहिती झाली, तीच युट्यूबर आता गद्दार निघालीय. होय, तुम्ही बरोबर ओळखलात. या गद्दार युट्यूबरचं नाव आहे ज्योती मल्होत्रा. याच ज्योती मल्होत्राने पर्यटन स्थळांची माहिती अशी काही दाखवली की शत्रूराष्ट्राला त्याचा फायदा झाला. तर चला पाहूया या गद्दार ज्योती मल्होत्राची कर्मकुंडली.ज्योती मल्होत्रा. नाव तर ऐकलंच आहात. हीच आहे ती गद्दार जिनं चालाखीने शत्रूराष्ट्राला भारताची माहिती पुरवली. ज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलवरील पर्यटन स्थळांचे व्हिडीओज पाहून शत्रूराष्ट्रांनी घातपात घडवलाय. हीच धक्कादायक माहिती समोर आली आणि फेमस युट्यूबर ज्योती मल्होत्रा गजाआड झाली. ज्योती मल्होत्राची कहाणी ही केवळ राजकीय नाही, तर एका हिंदी सिनेमाला शोभेल असा मसाला आहे. तिचे छान छान व्हिडीओज लोकांनी पाहिले. तिच्या व्हिडीओजमुळे लोकांना परदेश दिसलाय. तिच्यामुळे देशाविदेशातील खानपान, राहणीमान कळालं आणि आता अचानक तिच्यावर गद्दारीचा शिक्का बसला आणि लोकांना धक्का बसला. ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचं उघड झालंय. त्यामुळे एनआयए, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर विभागाने तिच्याभोवती चौकशीचा फेरा आवळलाय. इतकंच नव्हे तर तिचे क्लाऊड स्टोअरेजही चौकशी यंत्रणांच्या रडारवर आहे. झालंय असं की, ज्योती मल्होत्रा जम्मू - काश्मीरमधील अनेक पर्यटन स्थळांचे चित्रण करायची. आता पर्यटन स्थळांचं चित्रण होतंय, म्हणून जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात नव्हतं. याचाच फायदा ज्योती मल्होत्रा घेत होती. ती पर्यटन स्थळांची अशी काही माहिती द्यायची की त्यातून दहशतवादी आणि शत्रूराष्ट्राला इत्यंभूत माहिती मिळायची. सूत्रांच्या माहितीनुसार ती या व्हिडीओजमध्ये कुठे सुरक्षा यंत्रणा आहे, कुठून कसा प्रवास करायचा, कोणता मार्ग निवडायचा, कोणत्या गोष्टी कुठे आहेत आहे याची माहिती खुबीने द्यायची. ही गोष्ट एका व्यक्तीने लक्षात आणून दिली. त्यांनतर ती सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आली. ज्योती मल्होत्राचा संशयास्पद प्रवास, परदेशी संपर्क आणि यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले संवेदनशील व्हिडिओ पाहिले गेले. डिजिटल फॉरेन्सिक तपासणीत तिच्या विदेश दौऱ्यांसोबतच पठाणकोट, नाथूला पास आणि अरुणाचल प्रदेशातील सीमावर्ती भागांमध्ये संशयास्पद हालचालींचे पुरावे सापडले आहेत.
Asthma : आला पावसाळा, दमा असलेल्यांनी काळजी घ्या!
मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. एक दोन दिवसात अंदमान निकोबार बेटे व दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचण्याची शक्यता भारतीय हवामान ...
आता ज्योती मल्होत्रा पाकिस्तानला कशी पुरवायची माहिती तेही पाहूया.
- पाकिस्ताना गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क
- व्हॉट्सॲप, टेलिग्राम, स्नॅपचॅट ॲप्सचा वापर
- गुप्तचर अधिकाऱ्यांचे नंबर वेगळ्या नावाने सेव्ह करणं






