६२१० कोटींच्या बँक घोटाळ्यात यूको बँकचे माजी चेअरमन अटकेत

नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ED) ने युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुमार गोयल यांना ६२१०.७२ कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. ही फसवणूक कन्कास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड (CSPL) या कंपनीशी संबंधित आहे. गोयल यांना १६ मे रोजी त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरातून अटक करण्यात आली. हा तपास मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत सुरु असून त्यात CSPL आणि इतरांची चौकशी केली जात आहे. १७ मे रोजी गोयल यांना कोलकाता येथील विशेष न्यायालयात (PMLA) हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना २१ मे पर्यंत ED च्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


ED ने हा तपास कोलकाता CBI ने देखल केलेल्या FIR वर आधारित करून सुरु केला. या प्रकरणात CSPL ला मंजूर करण्यात आलेल्या क्रेडिट सुविधांचा गैरवापर होऊन सुमारे ६२१०.७२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळले आहे. ही मूळ रक्कम असून यामध्ये व्याजाचा समावेश नाही आहे. ED नुसार, गोयल यांच्या कार्यकाळात CSPL ला मोठ्या प्रमाणात कर्ज सुविधा मंजूर करण्यात आल्या होत्या आणि नंतर संबंधित गटाने त्या रक्कम वापरून त्याचा गैरवापर केला. याच्या मोबदल्यात, गोयल यांनी CSPL कडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फायदे मिळवले, असे तपासात उघड झाले आहे. या बेकायदेशीर फायद्याचे स्वरूप रोख रक्कम, मालमत्ता, महागड्या वस्तू, हॉटेल बुकिंग्स असे विविध प्रकार होते. हे फायदे शेल कंपन्या, बनावट व्यक्ती आणि कुटुंबियांच्या नावावरून दिले गेले होते जेणेकरून पैशाचा मूळ स्रोत लपवता येईल. ''अनेक मालमत्ता शेल कंपन्यांद्वारे खरेदी केल्याचे उघड झाले आहे'' असे ED ने सांगितले आहे.


या कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सुबोध गोयल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात होत्या. या शेल कंपन्यांना मिळालेले निधी हे थेट CSPL कडून आले असल्याचे समोर आले आहे. बनावट व्यवहार आणि फंड कंपन्यामार्फत पैसे लपवण्याची रचना ED च्या तपासात उघड झाली आहे. २२ एप्रिल रोजी ED ने गोयल यांच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी छापे टाकले. या छाप्यांमध्ये ED ला बेकायदेशीर महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. या प्रकरणामध्ये या आधी, ED ने सुमारे ५१० कोटी रुपयांच्या मालमत्तेवर (CSPL आणि त्याचे मुख्य प्रवर्तक संजय सुरेका यांच्याशी संबंधित) तात्पुरती जप्ती केली होती. ED देश भरतील अनेक ठिकाणी छापे टाकून महत्वाचे पुरावे हस्तगत केले होते.

Comments
Add Comment

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार

दहशतवाद्यांनी बर्फवृष्टीचा फायदा घेऊन घुसखोरी करू नये , सुरक्षा दलांनी सज्ज रहावे - अमित शाह

नवी दिल्ली : “केंद्र सरकारचे दहशतवादाविरोधातील “शून्य सहनशीलता” धोरण पुढेही कायम राहणार आहे”, असे केंद्रीय

मोठा अपघात टळला; फर्रुखाबादमध्ये खाजगी विमानाचा अपघात

फर्रुखाबा : उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथील विमान तळावर आज सकाळी एका खासगी विमानाचा

विषारी कफ सिरपमुळे २३ चिमुरड्यांचा मृत्यू, कंपनीच्या संचालकाला अटक

नवी दिल्ली : श्रीसन फार्मा कंपनीच्या कोल्ड्रिफ कफ सिरपच्या एका बॅचच्या निर्मिती प्रक्रियेत गंभीर गडबड झाली.

आंध्र प्रदेशमध्ये फटाक्याच्या कारखान्याला आग, ६ ठार

रायावरम (वृत्तसंस्था): आंध्र प्रदेशातील डॉ. बी. आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील रायावरम येथील एका फटाक्याच्या

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११