जगाला भारताची दहशतवाद विरोधी भूमिका सांगणार ५९ जणांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील एकूण नऊ अतिरेक्यांचे तळ तसेच अतिरेक्यांचे लाँच पॅड नष्ट केले. यानंतर भारताने दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश यांना शत्रू समजणार आणि त्यांच्या विरोधात कारवाई करणार असे जाहीर केले. दहशतवादाचा बीमोड करेपर्यंत कारवाई सुरू राहील असेही भारताने जाहीर केले. हीच भारताची दहशतवादाच्या विरोधातील भूमिका समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने एकूण सात राजकीय शिष्टमंडळं स्थापन केली आहेत. ही मंडळं जगातील विविध देशांचा दौरा करुन भारताची दहशतवाद विरोधी भूमिका तिथल्या नेतृत्वाला समजावून सांगणार आहेत.



पाकिस्तानने अतिरेक्यांवर झालेली कारवाई ही पाकिस्तान विरोधात झालेली कारवाई आहे; असा समज करुन घेऊन भारताच्या नागरी वस्त्यांना लक्ष्य केले. तसेच भारताच्या सैन्य तळांवर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. यानंतर भारताने पाकिस्तानच्या निवडक सैन्य तळांना लक्ष्य करुन प्रतिहल्ला केला. भारताच्या कारवाईचा धसका घेऊन पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव सादर केला. भारताने प्रस्ताव स्वीकारत शस्त्रसंधी स्वीकारली. पण पाकिस्तानने पुन्हा हल्ला केला अथवा दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या कारवायांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला तर भारत कारवाई करेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले. यानंतर भारताने जगभर राजकीय शिष्टमंडळं पाठवण्याची तयारी सुरू केली आहे.

भारतात दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी आणि त्यांना मदत करणारे देश या सर्वांच्या विरोधात कारवाई करणार, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. देशाच्या याच भूमिकेची माहिती जगातील सर्व प्रमुख देशांना दिली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने जगातील प्रमुख देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

एकूण सात सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगातील वेगवेगळ्या देशांना भेटी देणार आहे. यापैकी मुख्य शिष्टमंडळाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरुर करणार आहेत. हे शिष्टमंडळ अमेरिकेत जाणार आहे.

भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जनता दल युनायटेडचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे सर्व खासदार वेगवेगळ्या शिष्टमंडळांचे नेतृत्व करणार आहेत. प्रत्येक शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देऊन भारत सरकारची दहशतवादाविरुद्धची भूमिका समजावून सांगणार आहे. विविध पक्षांचे खासदार आणि माजी मंत्री आणि ८ माजी राजदूतांसह एकूण ५९ राजकीय नेत्यांचा सहभाग असलेली अशी सात राजकीय शिष्टमंडळं तयार करण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

भाजपाच्या बैजयंत पांडांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सौदी अरेबिया, कुवेत, बहरिन, अल्जेरियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. भाजपाच्याच रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि डेन्मार्कच्या सरकारशी तसेच युरोपियन युनियनशी संवाद साधणार आहे. जनता दल युनायटेडच्या संजय कुमार झा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, प्रजासत्ताक कोरिया, जपान, सिंगापूरच्या सरकारशी संवाद साधणार आहे. शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ यूएई, लायबेरिया, काँगो, सिएरा लिओनीच्या सरकारशी संवाद साधणार आहे.

काँग्रेसच्या शशी थरुर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गुयाना, ब्राझिल, कोलंबियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. द्रमुकच्या कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लॅटविया आणि रशियाच्या सरकारशी संवाद साधणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ इजिप्त, कतार, इथिओपिया, दक्षिण आफ्रिकेच्या सरकारशी संवाद साधणार आहे.
Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन