अकरावी प्रवेशासाठी ऑफलाइन प्रणालीची मागणी

वाडा : पालघर जिल्ह्यातील आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंटरनेट अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शिक्षण संचालनालयामार्फत अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आलेली असली, तरी जिल्ह्यातील बहुतांश भागांमध्ये अद्यापही सुसज्ज इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. ही बाब लक्षात घेता, खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी माननीय मुख्यमंत्री व माननीय शिक्षणमंत्री यांना याबाबत ईमेलद्वारे पत्र व्यवहार करत सविस्तर मागणी केली आहे.


दुर्गम व आर्थिकदृष्ट्या मागास भागांतील अनेक विद्यार्थ्यांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोनची सुविधा नसल्यामुळे ते ऑनलाइन फॉर्म भरू शकत नाहीत. परिणामी, त्यांची अकरावी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता असून, त्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पारंपरिक ऑफलाइन पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली आहे. ऑफलाइन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे सुलभ होईल आणि त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही.

Comments
Add Comment

वसईत गॅस पाईपलाईन फुटली

वसई : पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये वसंत नागरी परिसरात शनिवारी चार ऑक्टोबर रोजी सकाळी धक्कादायक घटना घडली.

शहरातील पंधराशे दुर्गामूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

पर्यावरणपूरक नवरात्र उत्सवाला प्रतिसाद विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर पालिका कार्यक्षेत्रात दुर्गा देवीच्या

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना