Pune News: उजनी धरणाकाठच्या रहिवाशांना भयंकर आजाराचा धोका! दूषित पाण्यामुळे कॅन्सर, त्वचारोगाची शक्यता

  73

पुणे: सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे, पुण्यात सुद्धा ऐन मे महिन्याच्या गरमीत अवकाळीने हजेरी लावली आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील उजनी धरणातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाच्या पाण्याबरोबरच पुण्यातील विविध रासायनिक कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक व प्रदूषित पाण्याने उजनी धरणातील पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला आहे.


पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वासहतीतील कारखाने, साखर कारखाने लाखों लीटर रसायनमिश्रित सांडपाणी सातत्याने भीमा नदीत सोडले जात आहेत. त्यामुळे उजनी जलाशयातील मासे व इतर जलचर प्राण्यांना तसेच लाखों नागरिकांना या प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. जलाशयाला जलपर्णीचा विळखा पडत आहे. या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तब्बल 117 टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे 20 टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा (Rajendra Singh Rana) यांनी केला आहे.



पुणे महापालिकेतील पाण्यामुळे धरण प्रदूषित



उजनी धरण (Ujani Dam) परिसरात पाहणी केल्यानंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास 20 पीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने यामुळे धरणातील सर्व 117 टीएमसी पाणी विषारी बनत आहे. या विषारी पाण्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले आहे. (Ujani pollution scary for health)


राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात फिरून पाहणी केल्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण आता मोकळे होऊ लागले आहे. या ठिकाणी जमिनीवर जे पांढऱ्या रंगाचे आवरण दिसत आहे. ते सर्व उद्योगातून येणाऱ्या विषारी रसायनाचे असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. अशावेळी विकासाच्या गोष्टी करताना पुणे आणि पिंपरी चिंचवड याला एक न्याय व उजनी धरणाखाली असलेल्या शहरांना दुसरा न्याय असे करणे योग्य आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

अजित पवारांच्या जिल्ह्यातच लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक बोगस लाभार्थी

राज्य सरकारची 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेचा गैरफायदा घेतलेल्या बोगस लाभार्त्यांच्या संख्येत वाढ

चिपळूण पिंपळी येथे कोसळलेल्या पुलाची मंत्री उदय सामंत करणार पाहणी

शनिवारी रात्री चिपळूण तालुक्यात पूल दुर्घटना घडली. चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसीकडे जाणारा महत्वाचा पूल

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या