मान्सूनमुळे जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी राहणार बंद

जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; दिवाळीनंतरच होणार सुरक्षित प्रवास


अलिबाग (विशेष प्रतिनिधी) : मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यास जाणाऱ्या पर्यटकांची कसरत काही महिन्यांतच संपणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ब्रेकवॉटर बंधारा तेही जेनेट्टी दरम्यान अॅल्युमिनीयम धातूचा एक ४० मीटर लांबीचा पूल बसविण्याचे काम सुरु आहे. या कामास काही दिवस लागणार असले, तरी पर्यटकांना या प्रवासाचा आनंद प्रत्यक्षपणे दिवाळीनंतरच घेता येणार आहे. त्याचवेळेस या जेट्टीचे लोकार्पण केले जाईल, अशी माहिती मेरीटाईमच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. लाटांचा वेग कमी व्हावा म्हणून किल्ल्यापासून ४० मीटर अंतरावर ब्रेटवॉटर बंधारा बांधण्यात येत आहे.


किल्ल्याचे पुरातत्व महत्त्व कमी होऊ नये यासाठी किल्ल्यापासून काही अंतरावर ब्रेकवॉटर बंधारा बांधण्यास भारतीय पुरातत्व विभागाने परवानगी दिली होती. या बंधाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक अॅल्युमिनीयम धातूचा पुलही बसविला जात आहे. याचे फॅब्रिकेशन पूर्ण झाले असून, हा पूल क्रेनच्या साह्याने आणून येथे बसविला जाणार आहे. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न मेरीटाईम बोर्डाचा आहे. त्याच वेळेस मान्सूनमुळे किल्ल्यात जाण्यास बंदी लागू होणार असून, थेट दिवाळीपूर्वी किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार आहे.


दरम्यान, किल्ल्यात जाण्यासाठी प्रवास सुरक्षित होणार असल्याने येथे पर्यटकांची संख्या वाढण्याची आशा व्यक्त केली जात आहे. पूर्वी हेलकावे खाणाऱ्या होडीतून लहान मुले, वयोवृद्ध माणसांना चढउतार करता येत नसे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांना किल्ल्यात जाता येत नसे. आता थेट किल्ल्यापर्यंत मोठ्या होडीने जाता येणार आहे. शेवटच्या टप्प्यात टाकण्यात येणारा अॅल्युमिनीयम धातूच्या पुलाचे जोडकाम पाण्याबाहेर करुन ते बोटीने आणून येथे बसविले जाणार आहे.


मुरुडचा ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येत असतात. राजपुरी व खोरा बंदर या जेट्टीवरून ते किल्ला पाहण्यासाठी बोटीने येत असतात. मात्र मार्चनंतर समुद्राच्या पाण्याला वेग असतो आणि बोटी हलायला लागतात. हाच कालावधी पर्यटकांचा असतो. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पर्यटकांना उतरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर ठेवावे लागते आणि ते भीती दायक असल्याने शासनाने जंजिरा किल्ल्यात नवीन प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला आहे.


प्रवासी जेट्टीसाठी ९३ कोटी रुपयांचे काम २०२३ साली सुरू झाले. ही जेटी किल्ल्याच्या मागच्या बाजूस असल्याने लाटांचा जोर असतो, म्हणून लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेकवॉटर बांधण्यात आले. मे २०२४ ला ब्रेकवॉटर पूर्ण झाले; परंतु जानेवारी २०२५ उजाडले, तरी जेटीचे पुढील काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. जेटीच्या पुढील कामासाठी लागणारे प्लिथं कॅप आगरदांडा परिसरात बनविण्याचे काम केले गेले.१५० मीटरचे ब्रेकवॉटर वॉलमुळे समुद्राच्या लाटा अडल्या जातील आणि प्रवासी जेटी पूर्णपणे सुरक्षित असेल. पर्यटकांना सहज जुटीवर उतरून किल्ला निवांत पाहता येईल. सुरक्षित व आनंददायी प्रवास होणार आहे.


ब्रेकवॉटर बंधारा ते किल्ल्यातील जेट्टीपर्यतच्या ४० मीटर अंतरासाठी एक अॅल्युमिनीयमचा पूल टाकला जात आहे. हे काम पूर्ण होण्यास काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर काही किरकोळ कामे शिल्लक राहतील, ती मान्सूनमध्ये केली जातील. मान्सून बंदी संपताच नव्या हंगामात या सेवेचे उद्घाटन होईल. - सुधीर देवरा (कार्यकारी अभियंता, मेरीटाईम बोर्ड)


Comments
Add Comment

गुटखा विक्रेत्यांना 'मकोका' लावणार!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गुटखा बंदीसाठी कायद्यात बदल करणार

नागपूर : "गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता.

विधानपरिषद सभापती-सदस्यांचा अपमान केल्याप्रकरणी सूर्यकांत मोरे हक्कभंगाच्या कचाट्यात

नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका पदाधिकाऱ्याने केलेल्या

आयएएस तुकाराम मुंढे अडचणीत; भाजप आमदारांनी केली निलंबनाची मागणी

नागपूर: डॅशिंग आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या

''सीएसएमटी' स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार'

नागपूर : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा

फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी ६० दिवसांत आरोपपत्र सादर करणार

नागपूर : "फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राज्य सरकार येत्या ६० दिवसांत

विदर्भ, मराठवाड्यातील रस्त्यांचे निकष कोकणाला लावू नका!

कोकणातील रस्त्यांच्या दूरवस्थेवरून आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडडले नागपूर : कोकणातील रस्त्यांची सातत्याने