शाळांना जिओ टॅगिंग करणे बंधनकारक

  47

रत्नागिरी : शासनाने राज्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. तसे पत्र शिक्षण आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी काढले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील सर्व शाळांना जिओ टॅगिंग करावे लागणार आहे.


महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटर संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रांसह टॅग करून माहिती भरण्यासाठी महा स्कूल जीआयएस अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर माहिती भरावी लागणार आहे.


शाळांमध्ये इंटरनेट सुविधा नसल्याने फोटो अपलोड करताना अनेक अडचणी येत आहेत. राज्यात काही ठिकाणी कागदोपत्री शाळा असल्याचे बोलले जाते. एकही विद्यार्थी, शाळेसाठी इमारत नसतानाही केवळ कागदोपत्री शाळा चालवल्या जात असल्याची चर्चा नेहमीच शिक्षण विभागात असते. या सगळ्या गोष्टींना आता आळा बसणार आहे.

Comments
Add Comment

मे महिन्यात लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याने चिपळूणमध्ये आत्महत्या का केली?

रत्नागिरी : चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून दोन दिवसांपूर्वी नदीत उडी मारून आत्महत्या केलेल्या नवविवाहित

‘प्लास्टिकमुक्त चिपळूण’ची महिलांच्या पुढाकाराने यशस्वी लढाई

१२ दिवसांत ४३७ किलो प्लास्टिक संकलन चिपळूण : चिपळूण शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण

रत्नागिरी : खेड नगरपरिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या स्व. मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र नूतनीकरण

लोटे एमआयडीसी कारखान्यात स्फोट, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक प्रा. लि. या रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (दि. २६ जुलै)

रत्नागिरी जिल्ह्याला २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २३ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज असून नदीकाठी राहणाऱ्यांना

Ratnagiri News: रत्नागिरी येथील आरेवारे समुद्रात ४ पर्यटकांचा बुडून मृत्यू

रत्नागिरी: आरेवारे समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी