कच्छसह, दादर-बीकानेर एक्स्प्रेसला पालघर येथे थांबा

  26

खासदार डॉ. सवरा यांच्या प्रयत्नांना यश


पालघर : पालघर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांद्रा टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि बीकानेर-दादर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा सक्रिय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून ही मागणी सातत्याने मांडली होती. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा विचार करता, तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी हे थांबे आवश्यक असल्याचे डॉ. सवरा यांनी वेळोवेळी अधोरेखित केले होते. पालघर रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर निश्चित करण्यात आले आहेत.



पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, येथे वाढवण बंदर, विमानतळ प्रकल्प, तसेच तारापूर एमआयडीसी यांसारखी महत्त्वाची औद्योगिक केंद्रे कार्यरत आहेत. वाढती औद्योगिक गरज आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या थांब्यांची आवश्यकता होती. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्याच्या नागरिकांना, उद्योग क्षेत्राला व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम होणार आहे.

Comments
Add Comment

वसईत डॉक्टरच्या ऑटोमॅटीक ईव्ही कारचा थरकाप उडवणारा अपघात

वसई : वसई येथील सन सिटी परिसरात एका डॉक्टरचा आणि त्याच्या पत्नीचा भयानक अपघात झाला. मिथिलेश मिश्रा असं या

आरक्षण बदलाचा ‘गेम’ सर्वाधिक चर्चेत

पवार, रेड्डींचा मोठा प्रताप फसला गणेश पाटील विरार : बांधकाम परवानगी देताना लाच स्वीकारण्यासाठी 'रेट' ठरवून मलिदा

पालिका अधिकाऱ्याकडे ३१ कोटींची अपसंपदा

लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल विरार  : वसई-विरार महापालिकेचे निलंबित उपसंचालक नगररचना वाय.एस. रेड्डी

जिल्ह्याची कृषिप्रधान ओळख मिटण्याची चिन्हे

वसंत भोईर वाडा : शासनाच्या शेतीकडे पाहण्याच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील पारंपरिक शेतीव्यवसाय अडचणीत आला

अवैध बांधकामांना माजी आयुक्तच जबाबदार

‘ईडी’ कार्यालयाकडून भांडाफोड विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात करण्यात आलेल्या घोटाळ्यामध्ये अनिलकुमार पवार

वसईत 'भूतांचा' अनोखा आंदोलन: स्मशानभूमी वाचवण्यासाठी प्रयत्न!

मुंबई : मुंबईपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसईत, स्थानिकांनी एका अनोख्या आणि सर्जनशील पद्धतीने