पाकिस्तान सरकार दहशतवाद्यांवर मेहरबान! छावण्या पुन्हा बांधणार, मृत दहशतवाद्यांच्या कुटुंबाला कोटीची मदत करणार

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय लष्कराने नष्ट केलेल्या दहशतवादी तळाचे पुनर्वसन करण्याची घोषणा पाकिस्तान शाहबाज शरीफ सरकारने केली असून, हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद मानून त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १ कोटी रुपये, जखमींना १० ते २० लाख रुपये आर्थिक मदत केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर यांच्या कुटुंबातील १४ जण ठार झाले होते, त्यानुसार त्याच्या कुटुंबियांना १४ कोटी पाकिस्तानी रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे जगभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना 'शहीद' घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा वर्षाव करणे, आणि त्यांची अड्डे पुन्हा उभारणे, हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे.



शाहबाज शरीफ सरकारचा दहशतवाद्यांना मदतीचा हात


शाहबाज शरीफ सरकार ज्या पद्धतीने दहशतवाद्यांच्या कुटुंबांना मेहरबान झालं आहे, त्यातून हे स्पष्ट होते की पाकिस्तान अजूनही दहशतवादाला गोंजारत आहे.



भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत  ७ मे च्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते. जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या संघटनांच्या छावण्या यादरम्यान उद्ध्वस्त करण्यात आल्या.  या दहशतवादी अड्ड्यांमध्ये भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती.



मसूद अझहरच्या कुटुंबियांना 14 कोटींची मदत


ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 दहशतवादी मारले गेले आहेत, त्यामुळे पाकिस्तान सरकार त्याच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये भरपाई म्हणून देणार आहे. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी घरे बांधणे आणि त्यांच्या मुलांची काळजी घेणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकार ही जबाबदारी पार पाडेल, असे पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मुक्ताफळं उधळली आहेत.


या घोषणेमुळे शांतता आणि दहशतवादविरोधी लढ्याचे ढोंग करणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो अजूनही दहशतवाद्यांचा हात धरून आहे.



प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना आर्थिक मदत


शाहबाज शरीफ सरकार प्राण गमावलेल्या पाक लष्कराच्या जवानांना 1ते 1.8 कोटी पाकिस्तानी रुपयांची भरपाई देणार आहे. सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदानुसार ही भरपाई दिली जाईल आणि त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपर्यंत पूर्ण वेतन आणि निर्वाह भत्ता दिला जाईल. तसेच पाक सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल आणि प्रत्येक सैनिकाच्या एका मुलीच्या लग्नासाठी 10 लाख पाकिस्तानी रुपये आर्थिक मदत म्हणून देईल. तर जखमी सैनिकांना 20 ते 50 लाख पाकिस्तानी रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. ज्या सैनिकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या घरांसाठी 1.9 ते 4.2 कोटी रुपये दिले जातील.

Comments
Add Comment

FASTag Rules : आता टोल नाक्यावरुन सुसाट जा...! फास्टॅगच्या 'KYV' कटकटीतून कायमची सुटका; NHAI चा मोठा निर्णय.

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)

उद्या अवकाशात 'सुपर मून'ने उजळणार रात्र!

चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार नवी दिल्ली : नववर्ष २०२६ च्या सुरुवातीलाच अर्थात उद्या ३ जानेवारी २०२६ रोजी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक रचनेत लवकरच बदल

प्रयागराज : शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करण्याची तयारी

‘निमेसुलाईड’ पेनकिलर औषधावर केंद्र सरकारची बंदी

१०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त क्षमतेच्या गोळ्यांच्या विक्रीस मनाई नवी दिल्ली : सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा

ॲमेझॉनच्या भारतातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी

एच १-बी व्हिसाच्या कठोर नियमांमुळे कामात बदल नवी दिल्ली : ॲमेझॉनने व्हिसा मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भारतात

बुलेट ट्रेनच्या मुहूर्ताची घोषणा!

१५ ऑगस्ट २०२७ ला धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या लोकार्पणाचा