कोकणातील सुरक्षित किनाऱ्यांचे कासवांना आकर्षण

बहुसंख्य माद्यांचा समुद्र किनारी मुक्काम


रत्नागिरी : गेल्या दोन वर्षात दापोली, गुहागर, राजापूर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील सागर किनाऱ्यांवर कासवे मोठ्या प्रमाणावर येऊन मुक्काम करू लागली आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षात येथील किनाऱ्यांवर कासवांची घरटी मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहेत. कोकणातील सुरक्षित समुद्र किनाऱ्यांमुळेच कासवांची पावले या ठिकाणी वळली असावीत.


ओडिशा येथे साधारणपणे १९७० च्या सुमारास कासवांच्या अभ्यासाला सुरुवात झाली. यातूनच कासवांना फ्लिपर मेटल टॅग लावण्यात आले. आतापर्यंत ओडिशामध्ये टॅग केलेल्या कासवांपैकी बहुसंख्य कासव तामिळनाडूच्या गल्फ ऑफ मन्नारपर्यंत आणि श्रीलंकेपर्यंत गेली आहेत. यातील बहुसंख्य माद्या त्याच भागात परत अंडी घालण्यासाठी आल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.



वनविभाग, कांदळवन कक्ष व कांदळवन प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रथमच महाराष्ट्रात सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून ऑलिव्ह रिडले कासवांचा अभ्यास करण्यात आला. फेब्रुवारी २०२२ मध्ये गुहागर येथे सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवलेली ‘बागेश्री’ सात महिन्यात अरबी समुद्रातून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, कन्याकुमारी ते श्रीलंकेपर्यंत पाच हजार किलोमीटर फिरल्याची नोंद आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी गुहागर येथे नेमलेल्या कासव मित्रांना एका मादीला ०३२३३ क्रमांकाचा लावलेला फ्लिपर टॅग आढळला. तपासाअंती या मादीला १८ मार्च २०२१ रोजी ओडिशा येथे फ्लिपर टॅग केल्याची नोंद आढळली. ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाची ही मादी गुहागर समुद्रकिनारी सुमारे ३५०० किलोमीटर प्रवास करून अंडी घालण्यासाठी आली होती. या वर्षीही रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मिळून ६४ माद्यांना टॅगिंग करण्यात आले आहे.


कासवांचा स्थलांतर पॅटर्न, अधिवासाची निवड, खाद्याची उपलब्धता, वातावरणातील बदल, जागतिक तापमान वाढ आणि अंडी घालण्यासाठी सुरक्षित ठिकाणे आदी अनेक घटक याला कारणीभूत असू शकतात, अशा अनेक बाबी कासवांच्या स्थलांतराविषयी अभ्यासकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी

राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय व