चीनचं मिसाईल, तुर्कीस्तानचे ड्रोन आम्ही पाडले - एअर मार्शल एके भारती

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर बाबत महत्तवाची माहिती दिली आहे. डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल एके भारती यांनी "पाकिस्तानने चीनचं एअर टू एअर मिसाईल PL-15 चा वापर केला होता. पण या मिसाईलने आपलं टार्गेट मिस केलं. फोटोमध्ये तुम्ही या मिसाईलचे तुकडे पाहू शकता. ते आता आमच्याकडे आहेत" असं म्हटलं आहे.


डीजी एअर ऑपरेशन्स एअर मार्शल ए.के. भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही Loiter munitions आणि Unmanned aerial system बद्दल चर्चा केली आहे. आम्ही हे munitions पाडले आहेत. तुम्ही त्याचे फोटो पाहू शकता. एका फोटोचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की ही YIHA सिस्टिम आहे आणि ती तुर्कीमध्ये बनवली आहे. पण आम्ही ते पाडले आहे. "


एके भारती यांनी भविष्यासाठी पाकिस्तानला इशारा दिला आणि म्हटलं की, "आमचे सर्व लष्करी तळ, आमच्या सर्व यंत्रणा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि भविष्यात गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी तयार आहेत. आपल्या नवीन यंत्रणेबद्दल बरच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे परंतु आपल्या जुन्या यंत्रणांनी देखील अद्भुत काम केलं आहे. आमच्या या यंत्रणांनी पाकिस्तानचे आधुनिक पिढीचे ड्रोन आणि मिसाईल देखील पाडली आहेत. युद्धात आपली ताकद दाखवणाऱ्या आपल्या या यंत्रणांनी पाकिस्तानी हल्ल्याला थेट आव्हान दिलं आणि शत्रूची शस्त्रे नष्ट केली. याशिवाय गरज पडल्यास आमची उपकरणं भविष्यातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत."


भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी "ऑपरेशन सिंदूरचं उद्दिष्ट फक्त दहशतवाद्यांचा खात्मा करणं आहे. आपण १०० दहशतवाद्यांचा खात्मा केला" असल्याचं म्हटलं आहे. तसेच दहशतवाद्यांचे अड्डे उडवून दिल्याचे पुरावे दाखवले. दहशतवादी हल्ल्याला लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये मुदस्सर, हाफिज जमील आणि युसूफ अझहर असे तीन मोठे दहशतवादी मारले गेले आहेत.

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ