IPL 2025: आयपीएल प्रेमींसाठी गुड न्यूज! उर्वरित सामने सुरू होण्याचा मार्ग मोकळा

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेले भारत पाक अघोषित युद्धाला विराम मिळाल्यामुळे, इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या वाढत्या तणावामुळे आयपीएलचे सामने काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते. मात्र अलीकडेच आलेल्या माहितीनुसार आयपीएलचे सामने पुनः खेळवले जाण्याची शक्यता आहे. हे सामने १६ किंवा १७ मे रोजी पुन्हा सुरू होऊ शकतात, ज्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.



कोणकोणत्या मैदानावर रंगतील सामने? 


आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने लखनऊ, हैद्राबाद, कोलकाता तसेच अहमदाबादमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. ज्याची सुरुवात, लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यादरम्यानच्या सामन्याने होण्याची शक्यता आहे. तर क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने हैद्राबादधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होऊ शकतात. क्वालिफायर २ व्यतिरिक्त अंतिम सामना कोलकाता येथे देखील आयोजित केला जाऊ शकतो. अंतिम सामना ३० मे किंवा १ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना

रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात