सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन

  108

सिंधुदुर्ग : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट जवळ राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा हातातली तलवार उंचावलेला असा भव्य पुतळा उभारला आहे. महाराजांच्या या पुतळ्याचे दर्शन घेऊन त्याचे मुख्यमंत्र्यांनी पूजन केले. पूजनानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी राजकोट किल्ला परिसराचा विकास करणार असल्याचे जाहीर केले.



शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी मालवणमध्ये किल्ले राजकोट जवळच्या परिसरात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. कालिदास कोळंबकर सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, सा. बां. विभाग (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, बांधकाम सचिव संजय दशपुते, सा. बां. कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील हे पण याप्रसंगी उपस्थित होते.


https://www.youtube.com/watch?v=uzNVL7V1bYw

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत महाराजांच्या पुतळ्याचे काम हाती घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मे. राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीकडून दर्जेदार स्वरूपात महाराजांच्या पुतळ्याचे राम सुतार यांचे सुपुत्र शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. समुद्राच्या दिशेने तलवारधारी स्थितीत योद्ध्याच्या आवेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची जमिनीपासून उंची ९३ फूट एवढी आहे. संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला असून पुतळ्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे. तसेच चौथऱ्यासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. २०० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहिले तरी पुतळ्याला काहीही होणार नाही. पुतळा भक्कमपणे उभा राहील याचीही चाचणी करून घेण्यात आली आहे. एकूणच सर्वोत्तम असा महाराजांचा पुतळा देखण्या स्वरूपात अभिमान वाटावा असा पुर्ण झाला आहे. सर्वात उंच स्वरूपातील महाराजांचा हा पुतळा आहे. पुतळा उभारणीत सर्वांचे योगदान मोलाचे ठरले. असे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी