मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन

मुंबई : प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि मेकअपद्वारे व्यक्तिरेखा जिवंत करणाऱ्या विक्रम गायकवाड यांचे मुंबईत निधन झाले. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत अनेक चित्रपटांतील पात्रांना विक्रम गायकवाड यांनी मेकअपद्वारे जिवंत केले होते. विक्रम गायकवाड यांच्या पार्थिवावर शनिवार १० मे २०२५ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. विक्रम गायकवाड यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावरुन श्रद्धांजली वाहिली आहे.


अभिनेते अशोक शिंदे यांचे वडील बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात विक्रम गायकवाड यांनी मेकअपची कला आत्मसात केली. आधी शाळेच्या मुलांना स्नेहसंमेलनासाठी मेकअप करण्याचे काम करत विक्रम गायकवाड यांनी मेकअपच्या कामाचा सराव केला. स्वतः सातवीत शिकत असताना विक्रम गायकवाड यांनी शाळांतील मुलांना चिमणी, गाढव, मोर, पोपट असा मेकअप करुन दिला होता. पुण्यातल्या सगळ्या मुलींच्या शाळेत मेकअपसाठी गेल्याचे विक्रम गायकवाड यांनी सांगितले होते. त्यानंतर एकांकिका, लोकनृत्य, संगीत नाटक स्पर्धांसाठी त्यांनी मेकअप करायला सुरुवात केली होती. दहावीत असताना सगळ्या संगीत नाटकातील दिग्गज कलाकारांचे मेकअप त्यांनी केले होते. आपल्यासमोर कोणी व्यक्ती नाही तर साक्षात देव आहे आणि त्याची पूजा आपण करत आहोत, या भावनेतून मेकअप केल्याचे विक्रम गायकवाड म्हणाले होते.


विक्रम गायकवाड यांच्या चित्रपटांमधील मेकअप करिअरची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावरील 'सरदार' या चित्रपटातून झाली होती. या चित्रपटासाठी त्यांनी परेश रावलचा सरदार वल्लभभाई पटेल ही भूमिका साकारण्यासाठी मेकअप केला होता. 'मेकिंग ऑफ महात्मा', 'बालगंधर्व', 'संजू', कपिल देव यांच्यावरील '८३' अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांचा मेकअप केला होता. मेकअप करुन व्यक्तीरेखा जिवंत केल्या होत्या.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये