वर्सोव्यात अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर कारवाई

येत्या काही दिवसांत ३५ अनधिकृत बांधकामे हटवणार


मुंबई : मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात मुंबई महापालिका प्रशासनाने कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. तसेच वर्सोवा (वेसावे) येथील अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर महापालिकेच्या के (पश्चिम) विभाग कार्यालयाच्या वतीने कारवाई करत या इमारतींचे  बांधकाम जमीनदोस्त केले.


वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) ही अनधिकृत बांधकामे बांधण्यात आली होती. त्यामुळे संबंधितांना वेळोवेळी नोटीस बजावून बांधकाम तोडण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाच्या वतीने कळविण्यात येत होते; परंतु त्यांच्याकडून काही कार्यवाही न झाल्याने तसेच दलदलीच्या भागातील या अनधिकृत बांधकामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने महापालिका उपायुक्त (परिमंडळ -४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.



वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन) तेरे गल्लीतील कुटूर हाऊस, वेसावे पंप हाऊससमोरील साईश्रद्धा निवास, गोमा गल्ली येथील नागा हाऊस, मांडवी गल्ली येथील झेमणे हाऊस, बाजार गल्ली येथील गणेश सागर या इमारतींचे मागील वर्षभराच्या कालावधीत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.  या पार्श्वभूमीवर तोडक कारवाई हाती घेण्यात आली.


दरम्यान, वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात (कोस्टल रेग्यूलेशन झोन) अशाप्रकारच्या आणखी ३५ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. ही बांधकामेही याच कारवाई अंतर्गत पुढील काही दिवसांमध्ये ही कारवाई करण्यात येतील, असे  महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शासकीय सदनिकांचे वाटप

मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईतील शासकीय निवासस्थान वाटपावरून येणाऱ्या तक्रारींची

पश्चिम रेल्वेवर शनिवारी ३०० फेऱ्या रद्द

मध्य रेल्वेचा उद्या मेगा ब्लॉक जलद आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल मुंबई : मुंबईकरांचे दैनंदिन आयुष्य

पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी

राज्यात जनसुरक्षा कायदा लागू

अध्यादेश जारी; कडव्या डाव्या संघटनांवर होणार कारवाई मुंबई : बहुचर्चित जनसुरक्षा कायदा अखेर राज्यात लागू झाला

नववर्षाच्या स्वागतापूर्वी रात्री रेस्ट्रोबार, पब आणि मॉल्समध्ये विशेष तपासणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने नववर्षाच्या स्वागत आणि गोवा क्लब तसेच कमला मिल प्रमाणे

मुंबईतील एनएससीआयला अग्निशमन दलाची नोटीस

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाच्यावतीने नववर्ष २०२६ च्या स्वागतासाठी