पाक विरोधातील मोहिमेत सैन्याचे मनोबल वाढवा ! मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे याचे जनतेला आवाहन

प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे!


कणकवली : देशात जी युद्धजन्य स्थिती आहे,त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जशासतसे उत्तर देत आहे. देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. आहे. केंद्र सरकारकडून ज्या सूचना,आवाहने केली जात आहेत,त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे. निष्पाप पर्यटकांना पेहलगाममध्ये अतिरेक्यांनी मारल्यानंतर मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अशावेळी सर्वांनी सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.


कणकवली येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते, भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरूनही सैन्याच्या कारवायांबाबत शंका उपस्थित न करता त्यांचे मनोबल कसे वाढेल असे काम करा. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत,भारतीय नौदलाकडून सागरी हद्द आणि मच्छिमारांना ज्या सूचना दिल्या जातील, त्या सर्व मच्छीमारांना पाळाव्यात, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अतिउत्साहीपणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले.



मी माझ्या मत्स्य व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. किनारपट्टी भागासाठी केंद्राने दिलेल्या सूचना व आदेश पाळण्यासाठी सहकार्य करावे, कोणीही मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, उत्साहाच्या भरात नियम सोडले जाऊ नये याची काळजी घ्या. प्रशासनालाही मच्छीमारबांधवांपर्यंत सूचना, आदेश पोहचविण्यास सांगण्यात आले आहे, असे श्री, राणे यांनी सांगितले, तिनही दलांचे सुरक्षेच्यादृष्टीने बारकाईने लक्ष आहे. जलदुर्ग व बंदरे सुरक्षिततेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.


मदरशांमधून शिक्षण मिळायला हवे, असा उद्देश आहे. मात्र दोडामार्गला मदरशांमध्ये तलवारी मिळाल्या. त्यामुळे गरज पडली तर सर्च ऑपरेशनही राबवाये लागेल, कुडाळ तालुक्यातील एका मदरशामध्ये बाहेरून फंडिंग होतेय, असे कानावर आले आहे. त्यामुळे मदरशांमधून शिक्षणच मिळायला हवें, यासाठी लक्ष ठेवले जात आहे, असेही राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

माणगावकरांची वाहतूक कोंडीतून सुटका

माणगाव-इंदापूर बायपासचे काम सुरू माणगाव (वार्ताहर): मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे. या रखडलेल्या

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात नऊ पर्यटक बुडाले

तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य एकाचा शोध सुरू आहे शिरोडा : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सिंधुदुर्ग -शिरोडा

संघाच्या शिस्तबद्ध संचलनात मंत्री नितेश राणे सहभागी; स्वयंसेवकांसोबत साजरा केला विजयादशमी उत्सव

देवगड (जि. सिंधुदुर्ग) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक प्रसंगी मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते होणार खड्डेमुक्त, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून निधी मंजूर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खड्डे बुजून रस्त्यांची डागडुजी करावी, रस्ते सुस्थितीत व्हावे,

करूळ घाटात कोसळली दरड, वाहतूक काही काळ ठप्प

वैभववाडी: तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळल्याने शुक्रवारी सायंकाळी या

सिंधुदुर्ग ठरणार एआय मॉडेल, मंत्री नितेश राणेंचे स्वप्न पूर्ण होणार

सिंधुदुर्ग : सध्याचं युग हे एआय युग आहे. प्रशासनही एआय तंत्रज्ञानाचा वापर करतंय आणि वेगाने विकास होतोय!