ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत हाय अलर्ट; मंदिर आणि विमानतळाच्या सुरक्षेचा आढावा

शिर्डी : ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे श्री साईबाबा मंदिर आणि साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. आज सायंकाळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसह साईबाबा मंदिर आणि शिर्डी विमानतळ या दोन्ही ठिकाणी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.


या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे आणि मंदिर सुरक्षा प्रमुख सतीश गोटेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आली असून, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांची तसेच स्थानिक नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे.



परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांची आणि मंदिरातील कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. यासोबतच मंदिरात आणले जाणारे फूल आणि प्रसादाचे साहित्य देखील बारकाईने तपासले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून, दिवसभरात अनेक वेळा बॉम्ब शोधक पथकाकडूनही मंदिराच्या परिसराची तपासणी केली जात आहे.


शिर्डी विमानतळावरही याच धर्तीवर सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून बारकाईने निरीक्षण केले जात आहे. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे यांनी दोन्ही ठिकाणांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिल्या आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर शिर्डी पोलिसांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कंबर कसली आहे.

Comments
Add Comment

'एसटी सोबत, स्वस्त सफर'! सुट्ट्यांसाठी एसटी महामंडळाची खास ऑफर, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्टांसाठी तुमच्याकडे परवडणारा प्लॅन नाही म्हणून तुम्ही घरी बसून आहात का? तर ही

मुंबई–लातूर द्रुतगती महामार्गाला गती

सहा जिल्हे जोडले जाणार मुंबई : मुंबई ते लातूर हा प्रवास अतिजलद आणि सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

तापमानचा पारा घसरणार, राज्यात भरणार हुडहूडी!

मुंबई: देशात सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र उत्तर भारतात सध्या दाट धुक्याची चादर पसरली

हद्दपार गुंडाने शहरात वास्तव्य करत केला महिलेवर बलात्कार! पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह

पुणे: पु्ण्यात गुन्हेगारी क्षेत्रातील वाढ नवीन नसली तरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय