केंद्र सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्र सरकारने गुरुवार ८ मे रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय प्रतिनिधींनी 'ऑपरेशन सिंदूर'ची थोडक्यात माहिती दिली जाईल. तसेच आता निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी सांगितले जाईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत हा विषय कसा हाताळत आहे त्याची कल्पना दिली जाईल. भारतीय सैन्य दले येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जाईल. भारताने 'ऑपरेशन सिंदूर' का केले आणि त्यातून काय साध्य झाले याबाबतही सर्वपक्षीय प्रतिनिधींनी सांगितले जाणार आहे.



पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला केला. अतिरेक्यांनी २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाची हत्या केली होती. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' केले. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील अतिरेक्यांचे तळ नष्ट केले. या पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांच्या विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती सर्वपक्षीय नेत्यांनी दिली जाणार असल्याचे संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. सर्वपक्षीय बैठक गुरुवार ८ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता संसद ग्रंथालय इमारतीच्या समिती कक्ष जी - ०७४ नवी दिल्ली येथे होणार आहे.


'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये अतिरेक्यांच्या नऊ तळांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात मुरीदके येथील लष्कर-ए-तोयबाचे मुख्यालय आणि अतिरेकी कारवायांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहावलपूरमधील प्रशिक्षण शिबिरांचा समावेश आहे. अवघ्या २५ मिनिटांत सैन्याने कारवाई पूर्ण केली. ही कारवाई बुधवार ७ मे २०२५ रोजी पहाटे एक वाजून पाच मिनिटे ते एक वाजून तीस मिनिटे या कालावधीत करण्यात आली. 'ऑपरेशन सिंदूर' ही एक नियंत्रित कारवाई होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाई पूर्ण होताच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना सैन्याच्या कामगिरीची माहिती दिली.


अतिरेक्यांच्या पाकिस्तानमधील पायाभूत सुविधा नष्ट करणे, कमीत कमी नागरी हानी करणे आणि व्यापक संघर्ष टाळणे हाच भारताचा हेतू होता; असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन