इतिहासात नोंदवलं जाणारं पाऊल! भारत-यूके दरम्यान ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

India-UK Free Trade Agreement पूर्ण; व्यापार, रोजगार आणि नाविन्याला नवे बळ


नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम (UK) दरम्यानचा महत्त्वाकांक्षी व परस्पर हिताचा Free Trade Agreement (FTA) अखेर पूर्ण झाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूकेचे नविन पंतप्रधान कीअर स्टार्मर (Keir Starmer) यांनी याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून गौरव केला आहे.





पंतप्रधान मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर सांगितले, "माझ्या मित्र PM @Keir_Starmer यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. भारत-यूकेने महत्त्वाकांक्षी आणि परस्पर हिताचा मुक्त व्यापार करार यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचबरोबर डबल कॉन्ट्रिब्युशन कन्वेन्शनलाही अंतिम स्वरूप देण्यात आले आहे."





या करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, नवोपक्रम व नावीन्य यांना चालना मिळेल. Comprehensive Strategic Partnership अजून मजबूत होईल आणि नव्या संधी खुल्या होतील, असं दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे.


कीअर स्टार्मर यांनी नमूद केलं की, "जगभरातील अर्थव्यवस्थांशी व्यापार अडथळे कमी करून भागीदारी वाढवणं हेच आमच्या 'Plan for Change' चं मुख्य उद्दिष्ट आहे."


या मुक्त व्यापार करारामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश आहे आणि तो नवीन रोजगार निर्मिती, उच्च जीवनमान, आणि उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान स्टार्मर यांना लवकरच भारतभेटीस येण्याचं आमंत्रण दिलं आहे.

Comments
Add Comment

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

तामिळनाडूतील निवडणुकीसाठी भाजपची ५६ जागा आणि ३ मंत्रिपदांची मागणी

चेन्नई  : भाजपने मागील वर्षी तामिळनाडूत जयललिता यांचा पक्ष एआयडिएमके यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक

तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड

नवी दिल्ली  : पश्चिम बंगालच्या राजकारणात गुरुवारी पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे मोठी खळबळ

पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत ३ वर्षांची सवलत

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश पोलीस दलात भरती होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी योगी सरकारने नववर्षाची

चलन निर्मितीत मोठा बदल; चलन कागदनिर्मिसाठी अत्याधुनिक तंत्र कार्यन्वयित

मुंबई : भारताच्या चलनात नाण्यांप्रमाणे कागदी नोटांनाही तितकेच महत्व आहे. पाचशे, दोन हजार यांसारख्या अनेक नोटा आज

एअरपोर्टवर विराटच्या भेटीला जमली 'विराट' गर्दी; चाहत्यांचा घेराव... सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल

गुजरात : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे ११ जानेवारीला वडोदरा येथे खेळवला जाणारा आहे. या सामन्यापूर्वीच