महत्वाची माहिती! पाकिस्तानच्या २ गुप्तहेरांना अमृतसरमधून अटक, भारतीय सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष

अमृतसरमधून ISI च्या दोन गुप्तहेरांना अटक. गोपनीय माहिती केली लिक!


अमृतसर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानसोबत वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमृतसरमध्ये दोन पाकिस्तानी गुप्तहेरांना पकडण्यात आले आहे. हे गुप्तहेर (Pakistani Spies) भारतीय लष्कर आणि अमृतसर एअरबेस संबंधित माहिती पाकिस्तानला पुरवत होते.


अमृतसरमधील बल्हाडवाल येथे राहत असलेला पलक शेर मसीह आणि सूरज मसीह यांना अजनाला पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आयएसआयला माहिती देण्याच्या बदल्यात, पाकिस्तान गुप्तचर संघटना या दोघांच्या बँक खात्यात पैसे जमा करत असे. त्यामुळे या दोघांविरुद्ध ऑफिशियल सिक्रेट अ‍ॅक्ट, बीएनएस कलम ६१(२) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



सैन्याच्या हालचालींवर ठेवून होते लक्ष


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करत होते आणि अमृतसरमधील सैन्याच्या हालचाली आणि  एअरबेसशी संबंधित माहिती मोबाईलवरील फोटो आणि व्हिडिओद्वारे पाकिस्तानला पाठवत होते. यासाठी त्यांना सिम कार्ड आणि फोन देण्यात आला होता. त्यांच्या इतर संपर्कांबद्दल माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांनी आयएसआयला कोणती माहिती शेअर केली आहे हे शोधण्यासाठी पोलिस त्यांची चौकशी करत आहेत.



अमृतसर पोलिसांकडून सखोल तपास


या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात असल्याचे अमृतसर पोलिसांचे म्हणणे आहे. दोन्ही आरोपींनी आतापर्यंत पाकिस्तानला कोणती माहिती दिली आहे आणि त्यामागे त्यांचा हेतू काय होता? याचा तपास केला जात आहे. या कृत्यात त्यांच्यासोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा देखील तपास पोलिसांकडून केला जात आहे. या आयएसआय एजंट्सकडून आर्मी कॅन्टोन्मेंट आणि एअरबेसबद्दल माहिती असलेली कागदपत्रे पोलिसांना सापडली आहेत. तसेच काही छायाचित्रे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.


दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करून अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. देशभरातून व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. तर आयात-निर्यातीवरही बंदी घालण्यात आली आहे.

Comments
Add Comment

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर

दिवाळी-छटसाठी देशभरात धावणार १२ हजार विशेष गाड्या

नवी दिल्ली  : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार यंदा दिवाळी आणि छट यांसारख्या सणांच्या

भारत-ब्रिटनमध्ये 'व्हिजन २०३५' वर निर्णायक चर्चा! PM मोदी 'या' खास पाहुण्याचं करणार स्वागत

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांचा पहिला भारत दौरा; फिनटेक आणि आर्थिक सहकार्यावर लक्ष मुंबई: पंतप्रधान