राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक

जैसलमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. पठाण खान असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवत होता. पठाण खान हा आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता.



राजस्थानमध्ये इंटेलिजन्सच्या पथकाने महिन्याभरापूर्वी पठाण खान याला अटक केली. त्याची महिनाभर चौकशी सुरू होती. आता त्याच्या विरुद्ध १९२३ च्या अधिकृत गुपिते कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पठाण खान याला १ मे २०२५ रोजी गुन्हा नोंदवून औपचारिक अटक करण्यात आली. हाती आलेल्या माहितीनुसार, पठाण खान पहिल्यांदा २०१३ मध्ये पाकिस्तानमध्ये हेरगिरीच्या प्रशिक्षणासाठी गेला होता. यानंतरही अधूनमधून तो पाकिस्तानमध्ये जाऊन आला आहे. पठाण खानने अनेकदा भारताशी संबंधित महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवली आहे.

पठाणने नेमकी कोणकोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे. या माहितीचा पाकिस्तानकडून गैरवापर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार पठाण खानला पाकिस्तानकडून वेगवेगळ्या मार्गान हेरगिरीसाठी पैसा दिला जात होता.



पाकिस्ताकडून सलग आठव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानने सलग आठव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारताने पाकिस्तानच्या गोळीबााला चोख प्रत्युत्तर दिले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

पाकिस्तानने लहान शस्त्रांद्वारे कुपवाडा, बारामुला, पूँछ, नौशेरा, अखनूरमध्ये भारताच्या चौकी - पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार केला. भारत - पाकिस्तान सीमेवर गोळीबार सुरू असल्यामुळे दररोज कित्येक तास स्थानिकांना बंकरमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारी योजनेत सीमेजवळच्या शेकडो गावांमध्ये दर्जेदार बंकर बांधण्यात आले आहेत. या बंकरमध्ये नागरिक सुरक्षित आहेत.

आंतरराष्ट्रीय सीमेवरील आरएस पुरा आणि अर्निया सेक्टरमध्ये पिकांची कापणी पूर्ण झाली असली तरी, कठुआ, सांबा, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांमध्ये अजूनही सुरू आहे. पठाणकोट हल्ल्यानंतर भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केला आहे. पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेले व्हिसा रद्द केल्याचे भारताने जाहीर केले आहे. भारत - पाकिस्तान राजनैतिक संबंध कमी करण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

विवाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार